
सातारा जिल्हा बॅकेच्या विविध ठेव, कर्ज व विमा योजनाची माहिती शाखाधिकारी बजरंग पवार यांनी उपस्थित महिलांना यावेळी दिली .
जिल्हा बॅकैच्या मुख्य कार्यालयाच्या आदेशानूसार प्रत्येक शाखेत महिला दिन साजरा केला गेला. येराड शाखेचे शाखाधिकारी बजरंग पवार यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या महिला दिनाच्या कार्यक्रमात प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका संध्या झिंजुर्के यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले, या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्या सिंधूताई घाडगे, अंगणवाडी सेविका कुसुम गुरव, छाया कांबळे , ज्योती जंगम, सीमा झगडे सोसायटी सचिव सुनिल साळुंखे, सुकल्पेश पवार विविध महिला तसेच बचत गटांच्या पदाधिकारी सदस्या व बनपेठ येराड मधील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या,
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सागर सुर्यवंशी यांनी केले, येराड, शाखा सेवक महाडिक मॅडम यांनी आभार मानले.
































