फलटण प्रतिनिधी:- साखरवाडी येथील चॉकलेट फॅक्टरी मधील चोरी प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले असून यातील चोरी झालेले 110 किलो तांबे ग्रामीण पोलिसांनी हस्तगत केले आहे.
साखरवाडी येथील चॉकलेट फॅक्टरी ही 2017 साली बंद पडलेली आहे. त्या बंद पडलेल्या चॉकलेट फॅक्टरी चा परिसर अतिशय मोठा असून संपूर्ण फॅक्टरी राखण्यासाठी पूर्वी फक्त एक वॉचमन होता. याचा फायदा घेऊन काही गुन्हेगारांनी सदर फॅक्टरीत असणारे तांब्याचे पाईप वेळोवेळी चोरून नेऊन तांबे भंगार मध्ये विकले होते. सदर बाबत फॅक्टरी मॅनेजर ऋषिकेश चंद्रकांत बनकर ( राहणार साखरवाडी तालुका फलटण) यांनी दिनांक दोन नोव्हेंबर रोजी चॉकलेट फॅक्टरी खिड़की दरवाजे मधून प्रवेश करून अज्ञात चोरटयांनी घरपोडी करून फॅक्टरीतील भंगार चोरून नेल्या बाबतचा गुन्हा ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला केला.
दाखल चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना विष्णू उत्तम बोडरे (राहणार साखरवाडी तालुका फलटण) व त्याचे इतर पाच साथीदार यांनी एकत्रित वेळोवेळी चोरी केलेले भंगार बाहेर काढून विकले असल्याचे निष्पन्न झाले. चोरी केलेले भंगार त्यांनी खामगाव मधील किसन सुरेश जाधव वय 24 वर्ष (राहणार खामगाव तालुका फलटण) या भंगार विक्रेत्याला विकल्याचे निष्पन्न झाले भंगार विक्रेत्याकडून 110 किलो तांबे हस्तगत करण्यात आले असून भंगार विक्रेत्यांस आरोपी करुन अटक करण्यात आली आहे. सदरचा गुन्हा पोलिस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलिस अधीक्षक आंचल दलाल, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनील महाडिक, पोलिस उपनिरीक्षक सागर आरगडे, सहाय्यक पोलिस फौजदार मोहन हंगे, पोलिस हवालदार नितीन चतुरे, पोलिस नाईक अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम, पोलिस शिपाई श्रीकांत खरात, हनुमंत दडस , गणेश यादव, चालक योगेश रणपिसे, संदीप मदने यांनी केली.