महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी फलटण
सातारा जिल्हयातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना विनंती कि ऊस बिलाची थकीत रक्कम मिळवण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना सातारा जिल्हा याचे वतीने दि. १७/०८/२०२० पासून वसुली आंदोलन सुरू होणार होते. त्यामध्ये सातारा पोलीसांच्या यशस्वी मध्यस्थीने किसनवीर कारखान्याचे अध्यक्ष मदनदादा भोसले यांनी येत्या १० दिवसात शेतकऱ्यांचे पैसे खात्यात देण्याचे मान्य केले व संघटनेला लेखी पत्र दि. १७/०८/२०२० ला आंदोलनस्थळी देण्याचे मान्य केल्याने सदर आंदोलन १० दिवसाच्या मुदतीवर स्थगित करीत आहोत.
१० दिवसात पैसे न मिळाल्यास परत आंदोलन करण्यात येईल यांची नोंद घ्यावी. त्यामुळे शेतकरी व पदाधिकारी यांना विनंती आपण उद्या सातारला आंदोलनस्थळी येऊ नये व जिल्हातील पुढिल थकित वसुली आंदोलन दि. २०/०८/२०२० ठिक १२ वा. वर्धन अॅग्रो प्रा.लि त्रिमली फाटा औंध येथे करण्यात येईल यांची सर्वानी नोंद घ्यावी व मोठ्या संख्येने सहभागी व्हावे ही विनंती असे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटना सातारा जिल्हा जिल्हाध्यक्ष श्री राजु शेळके यांनी दिले आहे. व सर्व पदाधिकारी शेतकरी बांधव.,या आंदोलनास मदत करणारे सर्व पत्रकार, पोलीस, शेतकरी यांचे आभार मानले आहेत.. तसेच आम्हाला वसुली आंदोलन या करोना महामारीत करण्यास भाग पांडू नये ही थकीत रक्कम ठेवणारे कारखानदार यांना विनंती करीत असून थकीत रक्कम ठेवणारे कारखानदार यांनी आपली भुमिका जाहीर करावी अन्यथा टप्प्या टप्प्याने आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे..