जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे ग्रामपंचायतींना आदेश!
कळंब प्रतिनिधी शहाजीराजे भोसले
कोरोना संसर्गाने ग्रामीण भागात हातपाय पसरायला सुरुवात केली आहे , याच पार्श्वभूमीवर नागरिकांनी नाका-तोंडाला “मास्क” लावणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे गावात पायी किंवा वहानांवर फिरणे तसेच पान – तंबाखू खाऊन थूंकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना दिले आहेत.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव ,खेड,शिरूर,मावळ , मुळशी , भोर,वेल्हा, हवेली , दौंड , बारामती , इंदापुर यांचे सह जिल्ह्यातील तेरा विधानसभा कार्य क्षेत्रातील ग्रामपंचायतींच्या परिसरात कोरोना प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेवून ग्रामपंचयतींना” दंडात्मक”कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री आयुष प्रसाद यांनी सर्व ग्रामपंचयतींना दिल्या आहेत.
ग्रामीणभागात कोरोना संसर्ग बाधीत व्यक्ती थूंकणे, शिंकणे व खोकणे या पासून भीती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेवून, नाका-तोंडाला मास्क असेल, तर संसर्ग होण्याचा धोका कमी असतो.अलीकडे पुणे जिल्ह्याच्या ग्रामीणभागात कोरोना प्रादुर्भाव वाढतांना दिसत आहे.म्हणूनच प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास आता सुरुवात केली आहे.ग्रामीणभागात नागरिकांनी घराबाहेर पडतांना तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे.पान खाऊन तंबाखू खाऊन रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी थूंकणे,मिस्री लावून थूंकल्याने या आजाराचा प्रसार तात्काळ पसरतो , अश्या थुंकी बहाद्दरांवर ग्रामपंचायतींनी दंडात्मक कारवाई करावी , थूंकणाऱ्यांवर किमान ५०० ते कमाल १००० रुपये दंड आकारण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून जाहिर करण्यात आली आहे.
दरम्यान या पूर्वीच बारामती आणि मुळशी या तालुक्यांतील प्रशासनाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मात्र जिल्हा परिषदेने आदेश काढून सर्व ग्रामपंच्यायतींना तसा आदेश दिला आहे.