शालेय विद्यार्थी, शिक्षक, व्यवसायिक, महिला बचतगट, रिक्षा संघटना व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा ही सहभाग.
निरा: ७५ वा स्वातंत्र्य दिन हा अमृत महोत्सव म्हणून देशभरात साजरा करण्यात आला. हर घर तिरंगा या बाबत घरोघरी झेंडा लावण्याचे आव्हान केले व जनतेने सुध्दा याला भरपूर असा प्रतिसाद दिला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त पुरंदर तालुक्यातील निरा येथे ३२१ फूट तिरंगा रॅली चे आयोजन करण्यात आले.
तिरंगा रॅली यशस्वी होण्यासाठी युवकांकडून अमृतमहोत्सव आयोजन कमिटी नेमण्यात आली. त्यातील सदस्यांना योग्य ती जबाबदारी देवून छत्रपती शिवाजी महाराज चौकातून राष्ट्रगीताने रॅली सुरू केली गेली. जय जवान जय किसान, वंदे मातरम्, भारत माता की जय अशा घोषणा देत नागरिकांनी सहभाग दर्शवला. शाळेतील विद्यार्थिनींनी ३२१ फुटाचा तिरंगा घेवून निघालेली रॅली व त्यांच्या मागे हलगी पथक, त्यानंतर भारतीय पोशाख परिधान केलेले विद्यार्थी, त्यामागे केशरी पांढरा हिरवा पोशाखात ग्रामस्थ, त्यांच्या मागे विविध धर्मांचे पोशाख परिधान केलेले विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिक अशा स्वरूपात रॅलीला आकर्षक असे रूप आले होते. रिक्षा संघटना कडून झेंडे लावून व तिरंगी फुग्यामध्ये रिक्षांची सजावट करून रिक्षा सहभागी करण्यात आल्या.
या रॅली मध्ये शालेय विद्यार्थी, व्यावसायिक, महिला बचतगट व ग्रामपंचायत प्रशासनाच्या पदाधिकारी व सेवक वर्ग, सर्व शाळांचे शिक्षकांनी उतस्फूर्तपणे रँलीत सहभाग घेतला होता. रॅली पाहण्यासाठी निरा बाजारपेठेतून लोकांनी प्रचंड गर्दी केली होती तर गावातील आसपास च्या परिसरात आकर्षक रॅली असल्याचे चर्चेला उधाण आले. शिवाजी महाराज चौकातून निघालेली रॅली बुवासाहेब चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक मधून ग्रामपंचायत कार्यालय येथे वंदे मातरम् चे गायन करून समाप्त झाली.