दिनांक 20 ऑगस्ट रोजी एका अज्ञात वाहनाने काळज गावातील विजेच्या खांबाला धडक दिल्याने काळज गावचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. यामुळे दोन दिवस वीज नसल्यामुळे गावातील नागरिक त्रस्त झाले आहेत. वीज नसल्यामुळे पंखा चालू नाही मच्छर चा त्रास घरात गरम सुद्धा होत आहे. गावचा पाणीपुरवठा बंद आहे पिण्यासाठी व वापरासाठी पाणी नाही यामुळे खूप बिकट अवस्था नागरिकांची झाली आहे.
या सर्व परिस्थितीमध्ये मात्र अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर सुट्टीचा आनंद लुटण्यात व्यस्त आहेत. खरंतर वीज पुरवठा हा अत्यावश्यक सेवा मध्ये मोडत असल्यामुळे एखाद्या ठिकाणी कोणत्याही कारणास्तव वीज पुरवठा खंडित झाला तर अशा ठिकाणी एम. एस. ई. बी. अधिकाऱ्यांकडून त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे व संबंधित कॉन्ट्रॅक्टरला त्वरित काम करण्यासाठी आदेश देणे गरजेचे आहे. कारण टेंडर भरतेवेळी कॉन्ट्रॅक्टरने अपघात होण्यापूर्वी किंवा अपघात झाल्यानंतर तत्काळ सेवा पुरवण्याची लेखी ग्वाही दिलेली असते.
परंतु काळज गावामध्ये दोन दिवस झाले विजेचा खांब पडुन वीज पुरवठा खंडित झाला आहे तरी सुद्धा अजून कसलीही सेवा पुरवण्यात आलेली नाही. एम एस ई बी च्या अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर कॉन्टॅक्टर व त्यांचे कामगार रविवारच्या सुट्टीवर आहे अशी उत्तर देत आहेत व जबाबदारी टाळत आहेत. यामध्ये एम एस ई बी अधिकाऱ्यांकडून नागरिकांना होणाऱ्या त्रासाचा कसल्याही प्रकारचा विचार केला जात नाही. त्यामुळे पुन्हा एकदा एमएसईबी चा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. अशा एम एस ई बी च्या कारभारामुळे सामान्य नागरिक हैराण झाला आहे. काळजगावातील नागरिकांकडून एमएससीबी अधिकाऱ्यांबद्दल व कॉन्ट्रॅक्टर बद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. व जे संबंधित कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांचे कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे.
वीजेचा खांब बसवण्यासाठी तास ते दोन तासाचा कालावधी लागेल पण गाव अंधारात ठेऊन अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर मस्त सुट्टीचा आनंद घेत आहेत. यापूर्वीही वीजेच्या बाबतीत अनेक तक्रारी अधिकाऱ्यांकडे केल्या असून याची कोणतीही दखल अधिकारी घेत नाहीत. अशा कामचुकार व मुजोर अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई व्हावी अशी नागरिकांनी इच्छा व्यक्त केली आहे.