बारामती प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाकडून मराठी भाषेतील उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीस स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार दिले जातात. या पुरस्काराकरीता पात्र ठरलेल्या साहित्यिकांना प्रदान करावयाच्या पुरस्काराचे स्वरूप जास्तीत जास्त रु.1,00,000/- (रुपये एक लक्ष फक्त) व कमीत कमी रु.50,000/- (रुपये पन्नास हजार फक्त) इतकी रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे आहे.
या वर्षीचा शिक्षणशास्त्र कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार आपल्या शिक्षण कोंडी पुस्तकाला मिळाला आहे. पारितोषिक रु.1,00,000 /- व स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र अभिनंदन परेश जयश्री मनोहर व संतोष शेंडकर, शिक्षणकोंडी रोहन प्रकाशन,पुणे सर्व आशा टीम यांचे सर्व महाराष्ट्र राज्यात कौतुक होत आहे.