महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :
सातारा दि. 2 : काल रात्री उशीरा प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील विविध रुग्णालये व कोरोना केअर सेंटर मध्ये येथे उपचार घेत असलेल्यामध्ये निकट सहवासित 28, प्रवास करुन आलेले 6, सारी 1, आय.एल.आय (श्वसनाचा सौम्य जंतू संसर्ग ) 2, आरोग्य सेवक 1 असे एकूण 38 नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित आले असून यामध्ये 25 पुरुष व 13 महिलांचा समावेश आहे तसेच सातारा येथील दोन बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
यामध्ये खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील चव्हाण आळी येथील 20 वर्षीय युवक व 50 वर्षीय महिला, शिरवळ मधील शिंदेवाडी येथील 36, 21 व 30 वर्षीय पुरुष, शिरवळ येथील 28 वर्षीय पुरुष,
कराड तालुक्यातील तारुख येथील 70 वर्षीय पुरुष, आगाशिवनगर मलकापूर येथील 24 व 32 वर्षीय पुरुष, मलकापूर येथील 29 वर्षीय पुरुष, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 26 वर्षीय पुरुष
वाई तालुक्यातील सोनगीरीवाडी धोम कॉलनी येथील 58 वर्षीय पुरुष व 11 वर्षीय युवक, 27 व 55 वर्षीय महिला, ब्राम्हणशाही येथील 72 वर्षीय पुरुष व 4 वर्षीय बालक, 27 वर्षीय महिला व 8 वर्षीय बालिका, सोनजाई विहार बावधन नाका येथील 16,20,40 वर्षीय महिला, खानापूर येथील 27 वर्षीय पुरुष व 49 वर्षीय महिला, शिरगाव येथील 31 वर्षीय पुरुष
सातारा तालुक्यातील शाहूनगर येथील 20 वर्षीय युवक, जैतापूर येथील 30 वर्षीय पुरुष, जरंडेश्वर नाका येथील 48 वषीय् महिला, संगमनगर येथील 14 वर्षीय मुलगी,खावली येथील 46 वर्षीय पुरुष, करंजे येथील40 वर्षीय पुरुष, अपशिंगे येथील 18 वर्षीय युवक
कोरेगाव तालुक्यातील तडवळे येथील 34 वर्षीय महिला व 6 वर्षीय बालिका,
पाटण तालुक्यातील कोयनानगर येथील 55 वर्षीय पुरुष, काजरेवाडी, खाले येथील 35 वर्षीय पुरुष
फलटण तालुक्यातील घाडगेवाडी येथील 58 वर्षीय पुरुष
खटाव तालुक्यातील कातरखटाव येथील 22 वर्षीय पुरुष यांचा समावश आहे.
सातारा येथील दोन बाधितांचा मृत्यु
काल रात्री सातारा येथील गुरुवार पेठ येथील 54 वर्षीय महिला व रविवार पेठ येथील 49 वर्षीय पुरुष यांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती डॉ. गडीकर यांनी दिली.
54 वर्षीय महिलेस तीव्र मूत्रपिंडाचा आजार व अतिउच्च रक्तदाबाचा त्रास होता तसेच व 49 वर्षीय पुरुष कोल्हापूर येथून प्रवास करुन आलेले असून त्याला अतिउच्च रक्तदाबाचा त्रास होता.
घेतलेले एकुण नमुने | 13533 |
एकूण बाधित | 1145 |
घरी सोडण्यात आलेले | 743 |
मृत्यु | 48 |
उपचारार्थ रुग्ण | 354 |