दहिवडी : ता.२५
वडूज तहसील कार्यालयातील लाच प्रकरणात अनिल उमापे यांनी प्रांतांकडे अर्ज करत चौकशीची मागणी केली होती. हे प्रकरण प्रांतांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे वर्ग केले होते.त्या अर्जाच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी यांना पत्रक जारी करत सदर प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रांतांना जारी केलेल्या पत्रात असे म्हटले आहे की अनिल उमापे यांचा अर्ज चौकशी न करता या कार्यालयात सादर करण्याचे प्रयोजन कळून येत नाही. तक्रार अर्जाच्या अनुषंगाने चौकशी करून आपल्या मार्फत उचित कार्यवाही करून अर्जदार अनिल उमापे यांना याबाबत कळविण्यात यावे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कार्यवाही करणे आवश्यक असल्यास स्वयं स्पष्ट अहवाल पुराव्याच्या कागदपत्रासह सादर करण्यासाठी प्रातांना कळवण्यात आले आहे.