मुंबई – येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर कला साहित्यिक विचारमंच महाराष्ट्र राज्य या संस्थेचा पहिला वर्धापनदिन
मुंबई दादर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन गोकुळदास पास्ता रोड मुंबई येथे नूकताच पार पडला.
स्वागतगीत लेखन कल्पना टेंभुर्णीकर यांनी केले असून गानसम्राज्ञी गायिका चैताली गवळे यांनी सादर केले विचारमंच डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन रसिक ऐकून तृप्त झाले
दीपप्रज्वलन महापुरूषांच्या प्रतिमेचे पूजन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज भिमराव यशवंत आंबेडकर व संस्थेचे पदाधिकारी डॉ विनोद जाधव प्रमुख सल्लागार नरेंद्र पवार अध्यक्ष माला मेश्राम उपाध्यक्षा अनिल सावंत सचिव कविसंमेलाध्यक्ष ज्येष्ठ कविवर्य बबनराव सरवदे अर्चना चव्हाण मधुकर दिवेकर राजीव खंडारे यांच्या शुभहस्ते करण्यात मान्यवर लोककवी सीताराम नरके चंद्रकांत जोगदंड आनंद गायकवाड रानकवी जगदीप वनशिव हरिश्चंद्र धिवार सुभाष मानवटकर कल्पना टेंभुर्णीकर यांच्या उपस्थिती मध्ये उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या कार्याची दखल घेऊन राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आले प्रामुख्याने उपस्थित असलेले रानकवी जगदीप वनशिव पुणे साहित्यिक गौरव पुरस्कार लोककवी सीताराम नरके शौर्य गौरव पुरस्कार प्रमोद सूर्यवंशी कला गौरव पुरस्कार अशा सोळा मान्यवरांचा शाल पुष्पगुच्छ मानपत्र सन्मानचिन्ह देवून पुरस्कार प्रदान केले व पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न झाला.
प्रास्ताविक नरेंद्र पवार यांनी केले ते म्हणाले संस्थेचे उपक्रम स्नेहभेट पुरस्कार कविसंमेलन काव्यलेखन स्पर्धा काव्यस्पर्धा पुस्तक प्रकाशन बुध्द विहार स्वच्छता अभियान वृक्षारोपण गरजू होतकरू व्यक्तीना मदत करणे वैचारिकता बिंबवणे परिवर्तन प्रबोधन ही नीती आहे निस्वार्थपणे विनाशुल्क असे कार्य संस्था काम अविरतपणे करत आहे प्रामाणिकपणा पारदर्शकता निस्वार्थी या तीन सूत्रे जपत आमची संस्था काम करते अन् ज्ञकरत राहीन अशी त्यांनी ग्याही दिली. संस्थेचे प्रमुख सल्लागार डॉ विनोद जाधव ते म्हणाले पुढील वर्षात आम्ही आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलन करून दाखवून असे आश्वासन दिले सर्व साहित्यिकांचे भोजन निवास हा मोफत असणार आहे
कार्यक्रमाचे उद्घाटक भीमराव आंबेडकर म्हणाले साहित्यिकांनी वाचले पाहिजे नवनवीन साहित्य निर्मिती केली पाहिजे लेखन वाचन यांचा आदर्श जतन करून आपण समाजाच्या हिताचे लिहिणे ही काळाची गरज आहे अनेक साहित्य संमेलन होतात पण अध्यक्ष निवडीची साहित्यात बोंबाबोंब सतत असते प्रगतीचा आलेख म्हणजे सुशिक्षित किती आहे तोच खरा आलेखात मांडतो. वामन दादांची शाहिरी जलसा गीते पोवाडा कर्नाटक राज्यात त्यांच्या साहित्यांचे प्रतिबिंब दिसते दहा भाषणे एक पोवाडा प्रगल्भ आहे
असे डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते त्यांची आठवण भिमराव आंबेडकर यांनी पुन्हा करू दिली सामाजिक बांधिलकी वैचारिक मंथन मार्मिक भाष्य करणारे साहित्य क्षेत्रात नाव लौकिक मिळवितात वाचन संस्कृती जतन केली पाहिजे
विचारमंचावरील मान्यवरांनी आपली मते मांडली अशाप्रकारे उद्घाटन प्रस्ताविक पुरस्कार वितरण सोहळ्याचे प्रथम सत्राचे सूत्रसंचालन वैशाली खंदारे यांनी केले
दुसरे सत्र निमंत्रित कवीचे कविसंमेलन अध्यक्षपदी ज्येष्ठ कविवर्य बबनराव सरवदे यांनी भूषविले राज्यांतून निमंत्रित चाळीस कवी हजर होते .
बुध्द फुले बाबासाहेब बाप जीवन उलगडून सांगणारी रचना सादर करून रसिकांची मने जिंकली योगिता कोठेकर पुणे सुर्यकांत कांबळे गोवा आनंद गायकवाड येरवडा चंद्रकांत जोगदंड पुणे गीताश्री नाईक प्रांजली काळभेंडे विरार वर्षा फटकळे मुंबई विलास पाटील इंगळी उदयनराजे कांबळे
इत्यादी कवी कवियत्रीनी कविता सादर केल्या
कविसंमेलन अध्यक्ष बबनराव सरवदे म्हणाले कविता ही वास्तव दर्शन घडविणारे विचार असावेत कवी भान ठेवावे वाचन केले पाहिजे अनेक पुस्तके वाचली तरच एक चांगली साहित्यिक पिढी जन्माला येते कवितेची चिरफाड करून वाचली तरच ती सादर करावी कवितेतून प्रबोधनकार भाष्य केले तरच समाजातील उणीवा भरून निघतीन कमीत कमी शब्दांत सांगायचं तीच खरी कविता असते असे ते म्हणाले विद्रोही चपराक वैचारिक मार्मिक भाष्य करत कविता सादर केल्या
समारोप प्रसंगी विचारांचा लकी ड्रॉ अनिल सावंत नरेंद्र पवार यांच्या शुभहस्ते काढण्यात आला सर्व साहित्यिकांच्या रसिकांच्या साक्षीने पाच बक्षिसे देण्यात आली गीताश्री नाईक मधुकर दिवे कल्पना टेंभुर्णीकर आशीर्वाद शहारे कमल वाघमारे यांना सर्व विजेत्यांना भारताचा राष्ट्रीय ग्रंथ संविधान भेट देण्यात आले .
कार्यक्रमात अनोखा उपक्रम राबविण्यात आला वर्धापनदिन सोहळा कसा झाला तो कसा वाटला हा अभिप्राय देण्यासाठी सभागृहातील एक रसिक अभ्यासू संवेदनशील सकाळ पासून संध्याकाळी हजर असणारा एक अवलिया निवेदक रानकवी जगदीप वनशिव पुणे यांना हा बहुमान मिळाला
आभार प्रदर्शन संस्थेचे नानाजी रामटेके यांनी केले बुध्द वंदना झाली अन् अशाप्रकारे वर्धापनदिनाची सांगता झाली