कराड शहर पोलीस घेतायत शोध
कराड : सन 2018 पासून सतीश विलास पाटील. व आदिती सतीश पाटील हे दोघे फरार आहेत यांचा शोध कराड शहर पोलीस घेत आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, लोक कल्याण मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटी नावाने बँक काढून ठेवीदारांचे फसवणूक करणारे आरोपी सतीश पाटील व त्यांची पत्नी आदिती पाटील हे सन 2018 पासून फरार आहेत. कराड शहर पोलीस ठाणे भाग पाच गुन्हा रजिस्टर क्रमांक 507 / 2018 भादविस कलम 404,406,407,409,415,418,420,424,503,504,506 सह महाराष्ट्र ठेवीदारांच्या ( वित्तीय संस्थेमध्ये ) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम 1999 चे कलम 3 प्रमाणे नोंद आहे.
नमूद गुन्ह्यातील फिर्यादी खुद्दुस आमिर हमजा मुजावर वय 31 वर्ष, रा. कार्वे ता. कराड. जिल्हा सातारा यांनी लोक कल्याण क्रेडिट मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड मुंबई शाखा मार्केट यार्ड कराड या शाखेत ठेव म्हणून रक्कम ठेवली होती. सदर सोसायटीचे मालक आरोपी सतीश विलास पाटील वय 36 वर्ष, व मॅनेजर आदिती सतीश पाटील वय 36 वर्षे (दोघे रा. ठिकपुर्ली ता. राधानगरी जि. कोल्हापूर) यांनी आपसात संगणमत करून लोक कल्याण मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड मुंबई. या वित्तीय संस्थेचे कराड मार्केट यार्ड, विद्यानगर, मलकापूर, उंब्रज, नागठाणे अशा नमूद ठिकाणी शाखा सुरू करून नमूद गुन्ह्यातील फिर्यादी व इतर 100 पेक्षा जास्त ठेवीदार व साक्षीदार यांची ठेव रक्कम घेऊन त्यास ठेव रक्कम व परतावा न देता त्यांचा विश्वास घात करून 1 कोटी 49 लाख 9 हजार 349 रुपये रक्कमेची फसवणूक केली असल्याचे तपासाअंती निष्पन्न झाले आहे, आरोपी हे गुन्हा केल्यापासून अटक वाचवण्याकरिता पळून गेलेले आहेत.
नमूद गुन्ह्यातील आरोपी यांचे मा. कोर्टातून स्टॅंडिंग वॉरंट प्राप्त आहे. नमूद गुन्ह्यातील दोन्ही आरोपी यांचा कराड पोलीस शोध घेत आहेत. तसेच पोलिसांच्या कडून आवाहन करण्यात आलेले आहे की, आरोपी सतीश विलास पाटील व आदिती सतीश पाटील या दोन्ही आरोपींच्या बाबत माहिती दिल्यास माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल तसेच त्यांना योग्य बक्षीस देऊन सन्मान करण्यात येईल.
सदरील आरोपीं बाबत माहिती मिळाल्यास विजय गोडसे सहाय्यक
पोलीस निरीक्षक कराड शहर पोलीस संपर्क मो. नं. 9923591262 व धीरज कोरडे पोलीस कॉन्स्टेबल कराड शहर पोलीस मो. नं.7350816100
या नंबर वरती संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.