महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : प्रतापसिंह भोसले (फलटण शहर)
फलटण तालुक्यातील ( शिंदेवाडी ) भागातील शेत जमिनीवर तसेच शेतातील पीक व पालेभाज्यावर गोगलगायचा वाढता प्रसार होऊ लागला आहे. या भागातील बहुतांश शेतकरी हे पावसाळ्यामध्ये सोयाबीनची लागवड करतात .चालूवर्षी मात्र गोगलगायच्या वाढत्या प्रसाराने , फलटण तालुक्यातील, विशेषत: ( शिंदेवाडी ) भागातील शेतातील पिकांवर, व झाडांवर गोगलगायचे वाढते प्रमाण हे शेतातील सोयाबीन व अन्य पिकांसाठी अत्यंत धोकादायक व नुकसान कारक ठरू लागले आहे.
गोगलगायचा वाढता प्रादुर्भाव हा सर्व शेतकरी यांना सोयाबीन व अन्य पिकांसाठी नुकसान कारक आहे. शासनाच्या प्रतिनिधींनी भयभीत झालेल्या शेतकरी यांना उभारी मिळणेकामी पिकांवरील गोगलगाय प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणेसाठी पिकांवरील झालेल्या गोगलगाय प्रादूर्भावाची पाहणी करून व नुकसाग्रस्त पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई आर्थिक स्वरूपात द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे .

शिंदेवाडी हे गांव राजकियदृष्ट्या माढा लोकसभा मतदार संघात व फलटण विधानसभा मतदार संघात येते . लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर , फलटण विधानसभेचे आमदार दिपक चव्हाण व महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर हे याच तालुक्यातील प्रतिनिधी आहेत .शासकीय स्तरावरून शेतकरी यांना नुकसान भरपाई देण्यासाठी लोकप्रतिनिधी यांनी मदत करण्याची मागणी तालुक्यातून होत आहे


















" width="265" height="168">















