सुरगाणा : तालुक्यातील बाऱ्हे परिसरातील शेतकऱ्यांना सुरगाणा मंडल अधिकारी एस.बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरगाणा उत्पादक कंपनी व कृषी विभाग सुरगाणा यांच्या संयुक्त विद्यमाने केळावण येथे शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन आधुनिक शेतीचे मार्गदर्शन दिले.
कृषीच्या विविध योजना (महा डिबीटी),आॕनलाईन अर्ज करणे, मिर्ची, दोडके लागवड, शेती विषयक नवनवीन प्रयोग, रासायनिक खते तसेच पाण्याच्या अति वापरामुळे होणारा दुष्परिणाम, माती पाणी परिक्षण, पिकावरील किड रोगाचे नियंत्रण, औषधाचा वापर, शेतमालाची खरेदी विक्री, मोबाईल अॕपद्वारे मिळणारी कृषी विषयक माहिती मंडल अधिकारी एस.बागुल, कृषी सहाय्यक उत्तम जगताप, भदाणे, चौरे यांनी शेतकऱ्यांना दिली. सेंद्रिय शेती, जमिनीची सुपिकता, पिकांवरील रोगराई, शेणखत, गांडुळ खत, कोंबड खत, लेंडी खत, कपनीचे ध्येय धोरणे, उद्दिष्टे तसेच सर्व शेतकऱ्यांनी एकञ येऊन आपल्या मालावर प्रक्रिया करून कसा विकता येईल अशा विविध विषयावर सखोल मार्गदर्शन सुरगाणा उत्पादक कंपनी लि.अध्यक्ष केशव पालवी,सचिव जयप्रकाश महाले यांनी शेतकऱ्यांना केले.
यावेळी कंपनीचे संचालक संजय पडेर, दिलीप दळवी, विलास जाधव, मोहन गावीत, कैलास भोंडवे, विलास चौधरी, पो.पा.विजय चौधरी, चंदर चौधरी, गणेश चौधरी, कंपनीचे संचालक भास्कर बेंडकोळी तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.