बारामती तालुक्यात दिवसागणिक कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे.त्यामुळे सरकारी यंत्रणेवरील ताण वाढला आहे.कोव्हिड उपचार केंद्र व क्वारंटाइन सेंटर येथील जागा अपुरी पडू लागली आहे.यावर उपाय म्हणून नटराज नाट्य कला मंडळाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहात २०० रुग्णासाठी कोव्हिड उपचार केंद्र सुरू केले आहे.याप्रमाणे बारामती तालुका शिक्षक सोसायटी संचालक मंडळाने अशोकनगर बारामती येथील वसतिगृह इमारत क्वारंटाइन सेंटरसाठी देण्यास तयार आहोत असा प्रस्ताव उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचेकडे सादर करावा अशी मागणीचे निवेदन कै. शिवाजीराव पाटील प्रणित बारामती तालुका प्राथमिक शिक्षक संघ,बारामती तालुका प्राथमिक शिक्षक समिती,बारामती नगर परिषद प्राथमिक शिक्षक संघ,बारामती तालुका अपंग कर्मचारी संघटना,बारामती तालुका कास्टट्राईब कल्याण महासंघ निर्मित “सभासद हित समन्वय समितीच्या वतीने संचालक मंडळास देण्यात आले.
बारामती तालुका शिक्षक सोसायटीची अशोकनगर बारामती येथे ४० खोल्यांची वसतिगृह इमारत आहे.गेले अनेक दिवस भाडेकरू अभावी इमारत रिकामी आहे.तसेच इमारतीचा यापूर्वी पाच ते सात वर्षे वैद्यकीय व्यवसायासाठी वापर झालेला आहे.त्यामुळे वसतिगृह इमारतीत कोरोनटाईन सेंटर सुरु करणे सहज शक्य आहे.बारामती तालुका शिक्षक सोसायटीने वेळोवेळी राष्ट्रीय आपत्ती वेळी भरीव योगदान दिलेले आहे.त्यामुळे आज कोरोना आपत्तीच्या काळात सामाजिक बांधिलकीतुन वसतिगृह इमारत कोरोनटाईन सेंटरसाठी देण्यास तयार असलेबाबतचा प्रस्ताव उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सादर करावा अशी मागणी समन्वय समितीच्या वतीने करण्यात आली. यावेळी हनुमंत शिंदे,आबासाहेब जगताप,केशवराव आगवणे,सुरेंद्र गायकवाड,सचिन हिलाळ, अविनाश कवडे,विकास कंकाळ,दत्तात्रय सुर्वे उपस्थित होते.