महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी: खा.श्रीनिवास पाटील यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासकामे साकारत आहेत. गावोगावी सुरू असलेल्या विकासकामांच्या माध्यमातून गावचा चेहरामोहरा बदलणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील यांनी केले. खा.श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या पाटण तालुक्यातील पवारवाडी (कुठरे) येथे प्रजिमा ५४ ते पवारवाडी रस्ता सुधारणा करणे कामाचा आणि गलमेवाडी येथे मंजूर झालेल्या जलजीवन मिशन योजनेतंर्गत नळ पाणीपुरवठा योजना कामाचा भूमिपूजन समारंभ संपन्न झाला. याप्रसंगी आयोजित केलेल्या कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपसभापती संजय देसाई, राजाभाऊ शेलार, रमेश मोरे, सरपंच दत्तप्रसाद कदम, उपसरपंच महेश लोहार यांची उपस्थिती होती.

सारंग पाटील म्हणाले, खा.श्रीनिवास पाटील यांनी पायाभूत सुविधा करण्यासाठी मोठा निधी उपलब्ध केला आहे. त्यातून रस्ते, वीज पुरवठा, पाणी पुरवठा, गटर, बंधारे अशी अनेक विकासकामे मार्गी लागली आहेत. नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा मिळाल्यास गावचा विकास होत असतो. त्यासाठी खा.पाटील यांच्या माध्यमातून कटिबद्ध असून प्रयत्नशील आहे.याप्रसंगी डोंगरी विकास समितीचे सदस्य शंकर शेडगे, मारुती मोळावडे, योगेश पाटणकर, सरपंच जितेंद्र चोरगे, रमेश नावडकर, शाखा अभियंता कांबळे, सुयश यादव, श्रीरंग यादव, संजय नलवडे, अन्य मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.रस्त्याच्या भूमिपूजन प्रसंगी सारंग पाटील, संजय देसाई व इतर
































