दोषीं विरोधात कडक कारवाई करणार :तहसिलदार,सोनाली मेटकरी
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले (कळंब – इंदापूर)
क्रांती सुर्य सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य वतीने दि. ०७/०९/२०२० रोजी प्रशासकीय भवन इंदापूर येथे मौजे कुरवली व जांब या गावातील रेशन दुकानदार यांच्या काळाबाजाराचा पाठपुरावा तहसील कार्यालय यांना गाव कामगार तलाठी यांनी चौकशी अहवाल दिला असता व कुरवली गावातील दुकानदार रेशन पावती , सहा माणसे रेशनधारक असल्यास पाच जणास धान्य देणे त्यात एका माणसाचे गाळणे यासारखे कृत्य आढळले म्हणून त्या दुकानदारावरती कोणती ही कारवाई केली नाही , असे आढळून आले.
म्हणून कुरवली व जांब या गावातील दुकाने सिल करण्यात यावी व त्याची सखोल चौकशी करुन त्यांचे परवाने रद्द करण्यात यावे तसेच पुढील गुन्हे दाखल करावे , उपोषणाच्या पहिल्या दिवशी सुराज्य निर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष आकाश पवार तसेच शेतकरी बेरोजगार अपंग व मजुर हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सागरबाबा मिसाळ तसेच NDMG चे इंदापूर तालुका उपाध्यक्ष् धनाजी गायकवाड व शेखर काटे यांनी आपला जाहीर पाठिंबा दिला आहे .
क्रांती सूर्य सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब सावंत , महासचिव अनिल दणाणे , कार्याध्यक्ष घनशाम निबांळकर , तालुका सचिव तानाजी चव्हाण , संजय दणाणे,अनिल बागाव , अशोक धोत्रे , संतोष कुंभार , नितीन शिरसागर ,स्वप्नील बाबर आदी कार्यकर्ते उपस्थित होते .
शासन स्तरावर दोषी आढळणारे दुकाने यांची चौकशी करून दुकानदारांवर कारवाई करणार असल्याचे इंदापूरच्या तहशिलदार सोनाली मेटकरी यांनी सांगितले आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमी वर सुरक्षितता बाळगणेचे व काळजी घेण्याचे आवाहन केले आहे .