महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी (दहिवडी)
शहरातील वाढलेले कोरोनाच्या संकटात म्हसवडचा सामान्य माणूस भरडला जावू नये , या साठी म्हसवडकर नागरीक एकवटले असुन लोकसहभागातुन निवासी शाळा येथे आॅक्शीजनसह १५ बेडचे मोफत कोरोना केअर सेंटर लवकरात लवकर सुरू करण्यासाठी म्हसवडकरांचे हजारों हाथ सेंटरच्या आवश्यक साधनांसाठी स्वयंफूर्तीने पुढे सरसावले आहेत. म्हसवड शहर व परिसरात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडून येत आहेत हे सापडलेल्या रुग्णास जिल्ह्यातही उपचारासाठी कोणत्याच हॉस्पिटल मध्ये बेड सोडा आॅक्सीजन हि उपलब्ध होऊ शकत नसल्यामुळे रुग्ण दगावण्याचे प्रकार घडू लागल्याने एकवटलेल्या म्हसवडकरांच्या हजारों हातानी एक हजारा पासुन दोन लाखा पर्यत लोकसहभागातुन मदतीचा मिळत असुन ज्या दानशुर व्यक्तीना या कामासाठी आर्थीक मदत करावी असे वाटते त्यांनी ९४२३८२७५२९ या नंबरवर संपर्क साधण्याचे आवहान म्हसवडकर नागरीकांनी केले आहे.
स्थानिक पातळीवरच म्हसवडच्या अत्यवस्थ रुग्णास मोफत उपचार मिळावे यासाठी येथील लांबमळा नजिकच्या शासकीय वस्तिगृह इमारतीत १५ ऑक्सिजन बेडचे हॉस्पिटल लोकसहभागातुन ऊभारण्याचा निर्णय नागरिकांनी घेतला असुन या इमारतीत १५ बेडला ऑक्सिजन पुरवठा करणारी यंत्रणेचे काम तातडीने पुर्ण करण्यात आले आहे.
या उपक्रमास नागरिकांनी स्वयंफूर्तीने प्रतिसाद दिला असुन अनेक दानशुरांनी मदतही दिली आहे तर काहींनी देऊ केली आहे. या नियोजित कोरोना केअर हॉस्पिटलसाठी शासनानेही मदत करुन आवश्यक त्या संख्येने कर्मचारी,डॉक्टर व गरजेची ओषधे तातडीने उपलब्ध करुन देणेसाठी प्रांताधिकारी,तहसिलदार, तालुका आरोग्य अधिकारी यांना या सेंटरचा प्रस्ताव तातकाळ पाठवून सहकार्य करावे अशी मागणी होत आहे दरम्यान या रुग्णालयातील १५ बेडच्या ऑक्सिजन (ओ टी) सेटअप साठी येथील धनंजीभाई नेमचंद शहा ट्रस्टचे श्री सुभाष हिराचंद शहा सातारा (म्हसवडकर), श्री.अरंजय नानचंदशेठ शहा (नगरशेठ) श्री संजय शेठ नानचंदशेठ शहा यांनी एक लाख तीस हजार रुपयांचा धनादेश देऊन या सेवाभावी उपक्रमात सर्वप्रथम सहभाग घेतला तसेच या हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णास गरजच भासली तर नियमित मोफत नाष्टा व सकस जेवण देण्याचे श्री.शहा कुटुंबाने दिले आहे.तसेच म्हसवड येथील श्री.राजकुमार दिनकर सूर्यवंशी व त्यांचे बंधू राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे म्हसवड शहर अध्यक्ष नगरसेवक युवराज दिनकर सूर्यवंशी व म्हसवड पालिकेच्या उपनगराध्यक्षा सौ.स्नेहल युवराज सूर्यवंशी परिवाराने या कोविंड हॉस्पिटलच्या उभारण्या कामी एकावन्न हजार रुपयाची मदत जाहिर केलीआहे.
येथील श्री.अरूण शेठ मगरूळे यांनी या नियोजित हॉस्पिटलसाठी आवश्यक असलेल्या वस्तुसाठी पाच हजार रुपये येथील मुस्लिम धर्मिय कांदा व भाजीपाला आडत व्यापारी जनाब फारूक सिजाउद्दीन काझी यांनी अकरा हजार रूपये स्वाभिमान शेतकरी संघटनेचे माण तालुका अध्यक्ष,पञकार नागेश्वर आबासाहेब विरकर यांनी सा जे चार हजार रुपये,म्हसवड रेशन दुकानदार असोसिएशन वीस हजार रूपये किमतीचे साहित्य,येथील श्री गणेश कवडे यांनी पाच हजार रुपये किमतीची गरजेची वस्तु देश केली आहे. येथील शेतकरी कलेक्शन चे संचालक कापड व्यापारी यांनीही पाच हजार शंभर रुपये मदत देऊ केली आहे,महाराष्ट्र रंगकामगार संघटना तर्फे या संघटनेचे अध्यक्ष विश्वासराव साळुंखे व कार्याध्यक्ष धनाजीशेठ सावंत यांनीही या नियोजित हॉस्पिटलसाठी आवश्यक ती मदत देण्याची तयारी दाखविली आहे. येथील फुटाणे हॉस्पिटलचे डॉ.सुर्यकांत फुटाणे यांनी या कोविड हॉस्पिटलसाठी दोन बेड व सक्शन (Suctiom Macine -1 )देणेचे मान्य केले आहे. येथील डॉ.राजेंद्र मोडासे यांनी या नियोजित कोवीड हॉस्पिटलसाठी एक्सरे मशीन व त्यासोबतच दोन बेड देऊ केले आहे येथील श्री.विजय मेंढापूरे यांनी बेड साईटच्या ट्रॉली देणेचे मान्य केले. येथील मुस्लिम धर्मिय अरिफ बशीर तांबोळी यांनीही पाच हजार रुपयांची मदत केली आहे.येथील नगसेविका श्रीमंत सौ. हिंदमालादेवी विजयसिंह राजेमाने यांनी २१ हजार रुपयांची मदत युवा नेते पृथ्वीराज राजेमाने दिली .येथील बाळासाहेब पानसांडे यांनी अकरा हजार रुपये येथील देवांग समाजाचे पांडुरंग दवंडे यांनी पत्नी मालन यांच्या स्मणार्थ पाच हजार एक रुपये मदत दिली आहे.येथील लक्ष्मी गणेश मंडळाने या उपक्रमास ११ हजार रुपयांच्या मदतीचे योगदान दिले आहे. सातारा येथील सीताराम ज्वेलर्सचे समचालक दिवड ता.माण येथील अशोकशेठ सीताराम सावंत यांनी कोविड सेंटर साठी सुमारे चाळीसहजार रुपये किमतीची ऑक्सिजन मशीन देऊ केली आहे.
महादेव रामचंद्र वााघमारेे पाच हजार रुपए,निरंज निर्मलकुमार व्होरा एक हजार,कु .सई गुरव ५०००,कै.भरत सराटे सामाजिक संस्थेेच्याा वतीने महेश भरत सराटे, राकेश सराटे ३०हजार, सिद्धांत यशोधन व्होरा ५००रुपये, गणेश ताराचंद म्हैत्रे २०००हजार , गणेश जवाहर कवडे ५०००हजार, अरुण मुकीरे ५०००हजार, आदीची मदत रोख तर काही साहित्य देवून करत आहेत आगामी काळात हि लोकचळवळ लोकानी चालवण्यासाठी एक पाऊल पुढे आले तरच या संकटावर आपन मात करु असा विश्वास युवराज सुर्यवंशी, अखिल काजी, कैलास भोरे, राहुल मंगरुळे,प्रशांत दोशी, डॉ राजेन्द्र मोडासे , डॉ राजेश शहा, अॅड पृथ्वीराज राजेमाने आदी दिवस रात्री झटणारे कार्यकर्यातुन भावना व्यक्त केली जात आहे

































