महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी (इंदापूर) : शहाजीराजे भोसले
दि.२१ संपूर्ण भारतात तमाशा पंढरी म्हणून ओळख असलेल्या नारायणगांव येथे तमाशा कलावंत आणि फड मालक यांनी उपोषण केले . आमदार अतुल बेनके यांनी तमाशा कलावंत आणि फड मालकांच्या मागण्या शासन दरबारी मांडू असे आश्वासन दिले . याच वेळी सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी दूरध्वनीवरून कलावंतांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करू असे आश्वासन लोकप्रिय तमाशा फड मालक रघुवीर खेडकर यांना दिले .
या बाबत अधिक माहिती अशी की , कोरोना प्रादुर्भाव असल्याने यंदा तमाशा हंगामावर आर्थिक संकट कोसळले . कलावंत फड मालक यांना त्यांचा उदर निर्वाह करणे जिकरीचे झाले . शासनाने विविध घटकांसाठी पॅकेज जाहीर केले . त्याच प्रमाणे आम्हालाही मिळावे या आणि विविध मागण्यांसाठी आज “तमाशापंढरी” नारायणगांव येथे उपोषण आयोजित केले होते . तळागाळातील तमाशा कलावंतांना , कर्मचाऱ्यांना लॉकडाउन काळात दरमहा पाच हजार रुपये मानधन मिळावे , तमाशा क्षेत्रासाठी वेगळे महामंडळ स्थापन करावे , प्रत्येक फड मालकांना आर्थिक पॅकेज द्यावे , कोरोना महामारी प्रभाव आणि लॉक डाउन संपल्यानंतर तमाशा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात यावी , कलावंतांना घरकुल आणि मुलांना मोफत शिक्षण दिले जावे आदी मागण्यांसाठी हे उपोषण करण्यात आले होते .
तमाशापंढरी शिवारातील फुलसुंदर मार्केट येथील प्रांगणात उपोषण केले . तेथे आज आमदार अतुल बेनके यांनी भेट दिली असता तमाशा फड मालक आणि कलावंतांशी त्यांनी चर्चा केली . तुमच्या रास्त मागण्या शासन दरबारी मांडू असे आश्वासन त्यांनी दिले . सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी देखील फोनवरुन कलावंतांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करू असे आश्वासन रघुवीर खेडकर यांना दिले . त्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले . यावेळी उपोषण स्थळी उपोषण कर्त्यांना भेट देण्यासाठी तहसीलदार प्रशासनाचे वतीने उपस्थित होते . तसेच अखिल भारतीय मराठी तमाशा महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले , शरद सांस्कृतिक कला प्रतिष्ठान अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया , डॉक्टर संतोष खेडलेकर , अमर पुणेकर , मालती इनामदार , शिरीष बोऱ्हाडे , सीमा पोटे , राजेश बागूल , शांताबाई संक्रापूरकर , शिबकन्या बढे , वर्षा संगमनेरकर ,कैलास नारायणगांवकर , संजय महाडिक शाफिभाई शेख,विशाल मुसभाई इनामदार , सुधाकर पोटे , महेश पिंपरीकर हे तमाशा फड मालक आणि कलावंत कर्मचारी त्याच प्रमाणे त्यांना पाटींबा देण्यासाठी ऑर्केस्ट्रा कलाकार दिग्दर्शक,दत्ता जाधव व संजय फल्ले उपोषण स्थळी उपस्थित होते .