महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी दहिवडी :
गेले सहा महिन्यापासून संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. या प्रतिकूल परिस्थितीत लोकांच्या हाताला काम नाही. गोर गरीब महिलांचे व्यवसाय बंद पडले. काम केलं तरच खायला मिळेल अशी परिस्थिती, त्यात सरकारने या लॉकडाऊनच्या दरम्यान होणाऱ्या सर्व प्रकारच्या करांना स्थगिती दिली आहे. ही स्थगिती सहा महिन्यानंतर उठल्यानंतर शासनाने दुसरा कोणता पर्याय उपलब्ध करून न दिल्याने महिलांकडे कोणताही आर्थिक स्त्रोत उपलब्ध नाही.
अशाच प्रतिकूल काळात, बँका, बचतगट, तसेच फायनान्सचे अधिकारी महिलांना सहा महिन्यांची मुद्दल व त्यावरील व्याजासाठी तगादा लावत आहेत, त्यांना दमदाटी करत आहेत. प्रतिकूल परिस्थतीमुळे या माय बहिणी आर्थिक संकटाचा सामना करत आहेत, त्यामुळे त्यांचं कर्ज माफ कराव. त्यांना होणारी दमदाटी थांबवावी, अन्यथा संपूर्ण माण खटाव तालुक्यात आंदोलन छेडणार असल्याचा इशारा ग्राहक प्रबोधन समिती माण- खटाव अध्यक्ष, राजू मुळीक व महिला अध्यक्षा, सौ.शारदा भस्मे यांनी दिला आहे.
यावेळी हे निवेदन नायब तहसीलदार वडूज (खटाव)श्री. जाधव साहेब यांना देण्यात आले. निवेदन देतेवेळी श्री.राजू मुळीक,अजित दडस,एकनाथ वाघमोडे,आदिक सावंत, योगेश पवार,सौ.शारदा भस्मे,सौ.सीमा सूर्यवंशी, सौ.सलमा डांगे,सौ.उषा शेंडगे,सौ.कविता देशमुख, सौ. सुनीता जाधव,सौ.मंगल बनसोडे, सौ.काळूबाई साठे,सौ.मानिनी कुंभार,सौ.उज्वला पाटोळे, आदींसह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.