महाराष्ट्र न्यूज दहिवडी प्रतिनिधी :
एकेकाळी माण महसूल विभागाने शासनाला सर्वात जास्त महसूल गोळा करून दिलेल्याची नोंद आहे.. महसूल गोळा करण्याच्या बाबतीत माण तालुका महाराष्ट्र मध्ये सर्वात आघाडीवर होता. गेल्या काही वर्षात माण महसूल बदनाम झाला आहे. माण महसूल विभागाच्या अनेक तक्रारी मंत्रालय पर्यंत गेल्या आहेत. आमदार जयकुमार गोरे यांनी या तक्रारी विधान भवनामध्ये विधानसभा अध्यक्ष यांच्या समोरही मांडल्या होत्या. तरीही या मध्ये सुधारणा झाली नाही महसूल च्या अनेक चोऱ्या भरदिवसा आणि रात्री होत होत्या अधिकारी मात्र याकडे देत नसल्याने महसूलचा कारभार ढिसाळ झाला होता.
या अधिकाऱ्यांना स्वार्थापोटी येथील राजकारणी देखील पाठीशी घालत होते. कोणाला तरी खुन्नस देण्याच्या कारणावरून राजकारणी नेते मंडळी या अधिकाऱ्यांना पाठीशी घालायचे. या अधिकाऱ्यांची बदली होऊ नये म्हणून काही नेते मंडळींनी देव पाण्यात घातल्याची चर्चा माण मध्ये सुरु असल्याचे समजते.
या तालुक्यात असणारी जननी माता माणगंगा नदी कमी पावसामुळे कायम कोरडी असते मलवडी पासून देवापूर पर्यंत या नदीचे पात्र खूप मोठे व पसरट असल्यामुळे या ठिकाणी वाळू साठा मोठया प्रमाणात आहे आणि हा वाळू साठा या तालुक्यातील वाळूचोरांनी रात्र आणि दिवस वाळू चोरीचा सपाटा चालू ठेवला होता. येथील शेतकरी वारंवार तक्रार करून देखील महसूल विभाग याकडे दुर्लक्ष करत होते या नदीपात्रापासून काही अंतरावर तलाठी राहायला आहेत शेतकरी फोन करून सांगायला गेले की फोन कट करायचे काही तलाठी यांनी वाळू चोरीची तक्रार करणाऱ्या पत्रकार बंधू चे मोबाईल नंबर ब्लॉक लिस्ट मध्ये टाकले आहेत. शेतातील माती दांडील शाहीने कोणताही महसूलचा परवाना नसताना चोरून नेतात. खडी क्रशर नियमबाह्य करतात अशा अनेक भ्रष्ट कारभारामुळे माण महसूल बदनाम झाला असल्याची चर्चा आहे.
या सर्वाना वठणीवर आणण्यासाठी दबंग अधिकारी तहसीलदार चंद्रशेखर सानप यांची माण तहसीलदार पदी नेमणूक केल्यामुळे तालुक्यातील लोकांमध्ये चर्चा सुरु आहेकी आता माण चा महसूल विभाग सुधारणार. त्यामुळे खादी घालून सोंग आणून वाळू चोरणाऱ्यांचे धाबे पुरते दणाणले आहेत.