महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी कराड : कोरोना प्रसाराच्या मंदावलेल्या वेगाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने माझे कुटुंब माझी जबाबदारी ही जनजागृती मोहीम सुरू केली आहे, त्या संदर्भाने जिल्हाधिकारी सातारा यांनी सर्व लोकप्रतिनिधींना जनजागृती करण्यासाठी पत्र पाठवले होते, त्या पत्राला प्रतिसाद देत लोकशाही आघाडी कराड यांच्या वतीने जनजागृती वाहनाचा शुभारंभ 11 ऑक्टोबर 2020 रोजी सहकार, पणन व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते पार पडला.
लवकर घेऊ शोध , लवकर करू तपासणी, निदान , लवकर करू उपचार, कोरोनाला करू हद्दपार, माझे कुटुंब माझी जबाबदारी अशा ओळींचा फलक वाहनावर लावून जनजागृती करण्याची मोहीम लोकशाही आघाडी कराड यांच्या वतीने सुरू करण्यात आली. याप्रसंगी नगरसेवक चंद्रकांत हिंगमिरे, कराड नगर परिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके, आघाडीचे गटनेते सौरभ पाटील, प्रतापराव साळुंखे, सुहास पवार, अख्तर आंबेकरी, शिवाजी पवार, जयंत बेडेकर, मुसद्दीक आंबेकरी, अमित शिंदे, सचिन चव्हाण, महेश पाटील, राहुल भोसले, रतन कांबळे, प्रकाश पवार उपस्थित होते.