महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी / माण :
माण-खटाव तालुक्यातील चारा छावण्यांतील झालेला भ्रष्टाचार,छावण्यांची बिले अदा करणेकामी तत्कालीन प्रांतअधिकारी आणी तहसिलदार यांनी घेतलेली टक्केवारी आणी मि. अधिकार्यांची वसुली करत असलेचे आरोप, अवैध वाळू प्रकरणी पकडलेला ट्रक कागदोपत्री जमा करत,बेकायदेशीरपणे सोडून देत तक्रार दाखल होताच पुन्हा जप्त दाखविणे. या आणी अशा अनेक गभीर प्रकरणांच्या लेखी तक्रारी मा. जिल्हाधिकारी सो सातारा यांचेकडे केल्या असून या कामी होत असलेला विलंब व वेळकाढूपणा हा संबंधित अधिकार्यांना पुरावे नष्ट करणे आणी अपुरी कागदपत्रे जमा करणेसाठी दिला जात असलेचा सनसनीत आरोप शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय भोसले यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले. असे आरोप करतानाच, जिल्हाप्रशासनाच्या आदेशाला माण महसूल अधिकार्यांनी कशाप्रकारे वाटाण्याच्या अक्षदा लावल्या या प्रकाराचा कागदोपत्री भांडाफोड केला आहे.
संबंधीत तक्रारींची चौकशी व त्यात होत असलेला विलंब या प्रकारांना कंटाळून भोसले व माणचे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी यांनी दि २१ आॅक्टोबर २०२० रोजी प्रांत कार्यालयाच्या पायर्यांवरती धरणे आंदोलन करताच भोसले यांना पहिल्यांदाच लेखी कारवाई करत असलेचे सुचित केले. परंतु यानंतर भोसले यांच्या हाती शासनाच्या काही कागदपत्रांच्या नकला आल्या आहेत. यामध्ये मा.अप्पर जिल्हाधिकारी यांनी मा.उपविभागीय अधिकारी दहिवडी यांना लेखी सुचित करताना स्पष्ट केले आहे की,दि.१३ आॅक्टोंबर २०२० रोजीच्या जिल्हा प्रशासनाकडून प्रत्यक्ष तपासनी दरम्यान दि.२७ मे २०२० रोजी अनधिकृत वाळू वाहतूक कारवाईच्या अनुशंगाने जप्त केलेल्या वाहनामध्ये गौनखनिज नसलेचे आढळून आलेले आहे.तरी सदर गौनखनिज चोरीच्या अनुशंगाने संबंधितावर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत.प्रस्तुत प्रकरणी सखोल चौकशी करावी असे नमूद केले असता तसेच लेखी आदेश मा.प्रांत यांनी तहसिलदार माण यांना दिला परंतु माणचे तहसिलदार यांनी कारवाईचा बागुलबुवा करत मा.मंडल अधिकारी यांनी लेखी आदेशीत करत वाहन मालक सचिन कोरे यांचेवरती गुन्हा दाखल केला आहे. या लेखी आदेशांचा मजकूर आणी त्याचा सोयीनूसार तहसिलदार यांनी लावलेला अर्थ व केलेली कारवाई जनतेच्या डोळ्यात धूळफेकण्याचा प्रकार असल्याचा भोसले यांचा आरोप आहे.
५ ब्रासने वाळूने भरलेला ट्रक तहसिल कार्यालयासमोरील पोलीस कवायत मैदान दहिवडी येथे जमा करत गाडीच्या चाव्या ताब्यात घेतलेच्या २७ मे २०२० रोजीचा मंडलाधिकारी यांच्या लेखी रिपोर्टनुसार हा ट्रक जागेवरती असणे अनिवार्य असताना कोणतीच कारवाई न होता या मैदानातून दोन महाने ट्रक गायब होतोच कसा आणी याची तक्रार ८ आॅक्टोंबर २०२० रोजी दाखल होताच,तो दोन दिवसातच ईतरत्र जमा दाखविला जातो याचे गौडबंगाल शासनाच्या प्रतिनिधींनाच माहीत असावे. ट्रक पकडला, सोडला आणी पुन्हा आणला जातो तो पुन्हा ईतरत्र रिक्त असलेचे सिध्द होऊन देखील अधिकार्यांची चौकशी न करता तसेच कोणत्या आदेशाने ट्रक एका जागेवरुन दुसर्या जागेवरती गेला याचा तपास न करता जिल्हा प्रशासन कशासाठी वेळकाढूपणा करत आहे हे न समजण्याईतपत जनतेला दुधखुळे समजण्याचा प्रयत्न करू नये. खालपासून वरपर्यंतच्या गैरव्यवहारातील लागेसंबंधाची अनेक उदाहरणे देखील जनतेला नक्कीच नवी नाहीत. कितीही वाचण्यासाठी आणी वाचविण्यासाठी प्रशासनातून वेळ दिलात तरी सत्य लपणार नाही याची खात्री असलेचे भोसले यांनी म्हणतानाच काही अधिकार्यांनी वर्तमानपत्रांमधून माझ्यावरती गुन्हे दाखल करणार असलेच्या दिलेल्या जाहीर धमकीची आणी भोसले यांनी केलेल्या तक्रारी माघार घेण्यासाठी टाकलेला दबाव याचीय जिल्हाधिकार्यांनी चौकशी करावी अशी भोसले यांची जाहीर मागणी असलेचे भोसले म्हणाले.






















