सातारा– विश्वशांतीप्रित्यर्थ, नैसर्गिक प्रकोप, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, दुष्काळ, अग्निभय, अतिउष्मा, महामारी सारख्या व्याधी, जगामध्ये होणारी युध्द, कोरोना व इतर सर्व प्रकारचे रोग या सर्वांचे निवारण होवून परस्पर सामंजस्य, बंधूभाव, प्रेम, सलोखा, आणि विश्वशांती स्थापित होण्यासाठी, जनकल्याणासाठी आपल्या सातारा शहरातील गांधी मैदान, राजवाडा येथे बुधवार दि. ३० मार्च २०२२ रोजी सकाळी ८ ते दुपारी २ यावेळेत शेकडो ब्रम्हवृंदांच्या पवित्र मंत्रघोष्यात भव्यदिव्य, न भुतो न भविष्यती अशा श्री महारुद्र पंचायतन महायज्ञ या धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे
भारतीय धर्मशास्त्रात, नीतीशास्त्रात, राजधर्मात आणि मानवी मूल्यांमध्ये यज्ञाला खूप मोठे स्थान देण्यात आले आहे. अगदी रामायण, महाभारत, चंद्रगुप्त काळ, विक्रमादित्य, भोजराज याशिवाय नजीकच्या काळात छत्रपती शिवराय यांच्या काळातही त्यावेळच्या शासक, प्रशासकांनी अनेक प्रकारचे यज्ञ केल्याचे पुरावे आपल्याला पहावयास मिळतात. दशरथ राजाच्या काळात दुष्काळ, महामारी आदी समस्या दूर करण्यासाठी वशिष्ठांनी यज्ञ करण्याचाच सल्ला दिला होता. युधीष्टीरानेही राजसूय यज्ञ केला होता.
दुष्काळ, अतिवृष्टी, अनावृष्टी, भूकंप, वादळ, वेगवेगळ्या साथींचे रोग, महामारी, युध्द, महायुध्द, अनाचार, नीतीमत्तेचे पतन या सर्वांचे निवारण पंचमहाभूतांच्या शुध्तेने होते, असे मानले जाते. आज वायूप्रदूषण, ध्वनिप्रदूषण, जलप्रदूषण यामुळे पृथ्वी संकटात सापडली आहे. सातारा शहर हि एक पवित्र भूमी आहे. नैसर्गिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या साताऱ्याचे स्थान खूप मोठे आहे. साताऱ्यात एखादी उत्तम, चांगली घटना घडली तर त्याचे अनुकरण अवघा महाराष्ट्र करेल. गेल्या दोन- तीन वर्षात कोरोन महामारीमुळे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे मोठी जीवित व वित्त हानी झाली आहे. भारतीय नववर्ष गुढी पाडव्याला सुरु होत असून याचे औचीत्त्य साधून सातारा शहरात एक मोठा धार्मिक सोहळा आयोजित करण्यात आल आहे.
तमाम सातारकर बंधू आणि भगिनी, अबालवृध्दांसाठी आणि जिल्हावासीयांसाठी हा आनंदाचा सोहळा ठरणार आहे. विश्वशांतीप्रित्यर्थ, नैसर्गिक प्रकोप, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, दुष्काळ, अग्निभय, अतिउष्मा, महामारी सारख्या व्याधी, जगामध्ये होणारी युध्द, कोरोना व इतर सर्व प्रकारचे रोग या सर्वांचे निवारण होवून परस्पर सामंजस्य, बंधूभाव, प्रेम, सलोखा, आणि विश्वशांती स्थापित होण्यासाठी, जनकल्याणासाठी आपल्या सातारा शहरातील गांधी मैदान, राजवाडा येथे बुधवार दि. ३० मार्च २०२२ रोजी सकाळी ८ ते दुपारी २ यावेळेत शेकडो ब्रम्हवृंदांच्या पवित्र मंत्रघोष्यात भव्यदिव्य, न भुतो न भविष्यती अशा श्री महारुद्र पंचायतन महायज्ञ या धार्मिक सोहळ्याचे आयोजन केले आहे. या साहेळ्यात श्री महारूद्र शंभूमहादेव, भगवान नारायण, सुर्य भगवान, श्री. महागणेश आणि जगदंबा तुळजाभवानी या पाच देवतांचे शुभाशिर्वाद आपल्याला यानिमीत्ताने प्राप्त होणार आहे. साताऱ्यातील प्रख्यात वेदशास्त्रसंपन्न, वेदमूर्ती विवेकशास्त्री गोडबोले यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या महायज्ञास सर्वांनी उपस्थित राहून या सोहळ्याची शोभा वाढवावी, तसेच प्रसादाचा लाभ घ्यावा. आपल्या वैयक्तीक, कौटुंबीक, सार्वजनीक समस्यांचे निवारण या महायज्ञात निश्चित होईल. तरी, या महायज्ञाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले आहे.