महाराष्ट्र न्यूज बारामती प्रतिनिधी / सुनिल निंबाळकर :
उसाच्या वजनातून मुळी बांधणी करिता (बायडिंग मटेरिअल) साठी वापरण्यात येणारे सामुग्रीचे क्विंटल मागे फक्त १% टक्काच वजावट करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी राज्यातील साखर कारखान्यांना दिले आहेत याबाबत साखर आयुक्त कार्यालयाने राज्यातील सहकारी व खासगी कारखान्यांना आदेश काढले आहेत.
या आदेशात म्हटले आहे की असे निदर्शनास आले की साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे ऊसाच्या वजनात ऊस मोळी बांधणी करता वापरलेल्या सामुग्रीचे वजन वजावट करतात याबाबत अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी या कार्यालयाकडे येत आहेत यामुळे ऊस नियंत्रण आदेश १९६६ मधील कलम (३) (३A) (iii) मधील तरतुदीनुसार मोळी बांधणी करिता वापरलेल्या सामुग्रीचे वजन जास्तीत जास्त एक क्विंटल ऊसामागे १ किलो (१ %) टक्का वजावट केंद्र शासन किंवा राज्य शासन किंवा साखर (आयुक्त) यांचे मान्यतेने करावयाची तरतूद आहे.
वरील प्रमाणे कायदेशीर तरतूद असताना साखर कारखाने मुळी बांधण्याकरिता वापरलेल्या सामुग्रीचे १% टक्क्यापेक्षा जास्त वजन ऊसाच्या वजनात घट करतात अशी तक्रार करण्यात आलेली आहे ही बाब विचारात घेता सर्व साखर कारखान्यांना सूचना देण्यात आल्या आहेत की मोळी बांधणीसाठी वापरलेल्या सामुग्रीच्या वजन ऊसाच्या वजनात घट करताना ऊस नियंत्रण आदेश १९६६ मधील कलम (३) (३A) (iii) नुसार कारवाई करावी असे आदेश देण्यात आले आहेत.
यासंदर्भात राजेंद्र यादव, कार्यकारी संचालक,श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना लि.सोमेश्वरनगर ता.बारामती,जी.पुणे यांनी देखील महाराष्ट्र न्यूज शी बोलताना या बाबत सहमती दर्शवली तसेच सोमेश्वर कारखाना या नियमांचे पालन करतो असे ते म्हणाले.