महाराष्ट्र न्यूज फलटण प्रतिनिधी गणेश पवारमहाराष्ट्र तसेच संपूर्ण देशाचे आराध्यदैवत म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना ओळखलं जातं आज त्यांची ३९१ वी शिवजयंती महाराष्ट्र तसेच देशभरात अतिशय उत्साहात साजरी केली जात असून यामध्ये बालचमूनचाही सहभाग अग्रनिय आहे यामध्ये सुरवडी तालुका फलटण जिल्हा सातारा येथील पवार मळा या छोट्याशा वस्तीवरील छोट्याशा बाल मावळ्यांनी एकत्रित येऊन शिवजयंती अतिशय उत्साहात साजरी केली व आपल्या बोबड्या बोलात शिवाजी महाराजांबद्दल भाषणं केली.यावेळी सर्व मुलांनी शिवाजी महाराजांचे गुणगान गायले . कुमार शिवम गणेश पवार याने मी शिवाजी या विषयावर उत्कृष्टपणे आपले बोबड्या बोलात मत मांडले. त्यानंतर भूमी पवार व स्वरा पवार यांनी शिवाजी महाराज व अफजल खान यांच्या भेटीचा पोवाडा अत्यंत उत्कृष्टपणे सादर केला. सृष्टी पवार व शंतनू पवार या दोघांनीही शिवाजी महाराजांवर आपले विचार व्यक्त केले. त्यानंतर तन्मय पवार व अर्णव पवार यांनी अत्यंत उत्साहात पूर्व शिवाजी शिवरायांचा पोवाडा गाऊन वातावरण मंत्रमुग्ध केले. शिवरायांचा जयजयकार करत कार्यक्रमाची सांगता झाली. सर्व मुलांकडून मयुरी व कोमल पवार या दोघींनी तयारी करून घेतली होती.