दहिवडी : ता.०६ मार्च
संत तुकाराम महाराज बीजेनिमित्त माण तालुक्यातील तुपेवाडी या ठिकाणी हनुमान मंदिरात तुकाराम बीजेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या बुधवार आणि गुरुवारी हा बीजोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
बुधवारी रात्री दातेवाडी येथील विष्णूदेव प्रासादिक नाट्यरूपी भारुडी भजनी मंडळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे , तर गुरुवारी सकाळी ०९:३०ते १२:०५पर्यंत झी टॉकीज प्रस्तुत मन मंदिरा फेम कीर्तनकार ह.भ.प.कबीर महाराज आतार यांच्या किर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. बरोबर दुपारी १२:०५वा. राष्ट्रसंत जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी केली जाणार आहे.
यानंतर सुरेश तुपे(मामा)यांच्या दातृत्वातून महाप्रसादाचे नियोजन करण्यात आले आहे. हे सर्व कार्यक्रम आटोपल्यावर दुपारी ०१:०० ते ०३:००वाजेपर्यंत कुस्त्यांची नोंदणी करावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे. कुस्त्यांचे जंगी मैदान भरवण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.






















