महाराष्ट्र न्यूज़ प्रतिनिधी:प्रतापसिंह भोसले(फलटण शहर)
जगभरामध्ये कोरोना व्हाइरसने थैमान घातले आहे. या कोरोनाच्या पार्शभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून जनजागृती साठी प्रल्हाद दत्तात्रय बोंद्रे व नागेश दत्तात्रय बोंद्रे यांच्या कुटुंबियांनी कोरोना थिम देऊनगौरी गणपती डेकोरेशन केले आहे. या थिम मधे गौरी आणि गणपती डॉक्टरच्या रुपात अवतरले होते.
तसेच त्यांनी विविध फलक तयार करुन जनजागृतीचे संदेश दिले आहेत. कोरोना काळात एकमेव चालणारे क्षेत्र म्हणजे…शेती, सोशल डिस्टंसिंग चे संदेश,अशा या अनेक संदेशामधुन त्यानी श्री गणरायाला साकडे घातले आहे की, हे गणराया संपुर्ण भारत देशा मधे थैमान घातलेल्या कोरोना या विषाणू पासून संपूर्ण भारतवाशियांचे रक्षण कर. व कोरोना हा विषाणू जगातून नष्ट कर. आरास पाहिल्यानंतर जणु स्वत: गणराया सर्वांना सांगत आहेत कि, काळजी करू नका, मी आलोय डॉक्टरांच्या रुपात कोरोनाचा नायनाट करायला…
मूरुम गावतील सर्व महिला व पुरुष श्री बोंद्रे कुटुंबियांनी केलेली आरास पाहण्यासाठी येऊन त्याना धन्यवाद देत आहेत.