फलटण प्रतिनिधी/श्रीकृष्ण सातव
फलटण : उत्तर प्रदेश मधील लखीमपुर खेरी येथे भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री यांच्या गाडीने शेतकऱ्यांना चिरडून मारले. त्याच्या विरोधात महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी सोमवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्यानुसार केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी फलटण तालुक्यातील महा विकास आघाडीने सोमवारी बंदची हाक दिली आहे.तसेच या निर्दयी कृत्याचा निषेध म्हणून सोमवार दि. ११ ऑक्टोबर रोजी संपूर्ण फलटण तालुक्यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळून बंद पाळण्यात यावा व उत्तर प्रदेशात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहून केंद्र सरकारच्या या निंदनीय कृत्याचा निषेध करुन फलटणचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात येणार आहे.
महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी श्रीमंत मालोजीराजे साहेब यांच्या पुतळ्याजवळ सकाळी ठिक १० वाजता जमावे असे आवाहन फलटण- कोरेगाव मतदार संघाचे आ. दिपकराव चव्हाण, फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे ना. निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण पंचायत समितीचे सभापती श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर फलटण पंचायत समितीचे सदस्य तथा फलटण तालुक्याचे युवा नेते श्रीमंत विश्वजितराजे रघुनाथराजे नाईक निंबाळकर, प्रदेश काँग्रेस कार्यकारिणी सदस्य सचिनभैय्या सूर्यवंशी बेडके, फलटण तालुका राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी बेडके, फलटण शहर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पंकज पवार, फलटण तालुका शिवसेनाप्रमुख विकास नाळे , फलटण शहर शिवसेना प्रमुख रणजितसिंह कदम यांच्या वतीने करण्यात आले आहे.