पिंपोडे बु।।- प्रतिनिधी
इ.५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेत श्री.विशाल कुमठेकर यांच्या वाघोली बीट मधील सोनके,पिंपोडेबुद्रुक,तळिये केंद्रातील शाळांनी कोरेगाव तालुक्यातील ग्रामीण विभागातील १७ शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्थांपैकी १४ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले.तर श्रीमती मनिषा चंदुरे मॅडम यांच्या सातारारोड बीटातील पिंपोडे खुर्द केंद्रातील ३ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले.ही चारही केंद्र श्री एस.बी.धनावडे यांच्याकडे आहेत. सोनके केंद्रशाळेतील सौ.विद्या लेंभे यांच्या मार्गदर्शनाखाली ७ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले.कु.अस्मिता रमेश चव्हाण हिने राज्यात सातवा क्रमांक मिळविला.नायगाव येथील न्यू इरा शाळेचे दोन विद्यार्थी शिष्यवृत्तीधिरक झाले. पिंपोडे बुद्रुक केंद्रातील सर्कलवाडी येथील श्री.केशव खरे यांच्या मार्गदर्शनाखाली २ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले त्यापैकी सुयश पाटील याने राज्यात ७ वा क्रमांक मिळवला.अनपटवाडी शाळेतील श्री.उध्वव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सिध्दार्थ भागवत शिष्यवृत्तीधारक झाला.त्याने तालुक्यात ५ वा क्रमांक मिळविला. तडवळे सं.वा शाळेतील संचिता भोईटे हिला श्री.अशोक क्षीरसागर यांनी मार्गदर्शन केले.तळिये शाळेतील सविता कदम यांनी साईराज देशमुख यास मार्गदर्शन केले.पिंपोडे खुर्द केंद्रातील अंबवडे येथील दोन विद्यार्थी यशस्वी झाले त्यामध्ये तनिष मुळीक याचा समावेश आहे.मुधाईदेवी हायस्कूल येथील ३ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले. या यशस्वी आणि उल्लेखनीय कामगिरीबद्दल कोरेगाव तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी तथा शिक्षणाधिकारी मा.धनंजय चोपडे ,भाग शिक्षणविस्तार अधिकारी मा.विशाल कुमठेकल,मा.मनिषा चंदुरे मॅडम,शिक्षक बँकेचे संचालक श्री किरण यादव यांनी यशस्वी विद्यार्थी,त्यांचे पालक ,मार्गदर्शक शिक्षक,केंद्रप्रमुख यांचे अभिनंदन केले.