कराड : नुकतेच महाराष्ट्र शासनाने परिपत्रक काढून थोर व्यक्तींमध्ये हिंदुरुदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा समावेश केला आहे. त्यामुळे सर्व शासकीय कार्यालयामध्ये रविवारी बाळासाहेब ठाकरे यांची ९४ वी. जयंती साजरी करण्यात आली.
कराड येथे परिवहन खात्यामार्फत डेपो मॅनेजर आस्मा सय्यद, टि.व्ही.पवार, आंनदा सावकर, शिवसेनेचे रामभाऊ रैनाक, काकासाहेब जाधव व कर्मचारी यांच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले. तसेच आर. टी. ओ. कार्यालय कराड येथे मोटर वाहन निरीक्षक चैतन्य कणसे, वरिष्ठ लिपीक राजेंद्र देशमुख, वाहन प्रतिनिधी फिरोज मुल्ला यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
तसेच तहसीलदार कार्यालय कराड येथे निवासी तहसीलदार आनंदराव देवकर, पुरवठा निरीक्षक महादेव आष्ठेकर, यांच्या वतीने बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन करण्यात आले तसेच विविध रिक्षा गेट, शिवसेना शाखा या ठिकाणी शिवसैनिकांनी अभिवादन केले.
यावेळी शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, उपजिल्हाप्रमुख रामभाऊ रैनाक , उपतालुकाप्रमुख काकासाहेब जाधव, सुनिल पाटील,शंकर विर,मा. शहरप्रमुख प्रमोद वेर्णेकर, राजेंद्र माने,विभागप्रमुख प्रविण लोहार, नितीन देसाई, धनाजी पाटणकर, निलेश पारखे, वाहतूकसेना प्रमुख ज्ञानदेव भोसले, दशरथ धोत्रे, सचिन महाडिक, अमोल कणसे, संघटक नितीन खेडकर,डाॅ.राजेंद्र कठंक, प्रसिद्धीप्रमुख अजित पुरोहित, शाखाप्रमुख भार्गव शिंदे, अमन पटेल, अशोक शिंदे, भिमराव साठे, दत्ता गायकवाड, रिक्षा युनियनप्रमुख बबलु मुल्ला, विजय पाटील, मलकापूर उपशहरप्रमुख दीपक मुट्टल आदी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.