पाटण : महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर कट्टा या उपक्रमांतर्गत सातारा (ग्रामीण) जिल्हा समन्वयक पदी कोयना शिक्षण संस्थेच्या बाळासाहेब देसाई कॉलेज पाटण मधील भूगोल विभागातील प्रा. संदीप तडाखे यांची नियुक्ती करण्यात आली. ते करिअर कट्टा चे महाविद्यालयीन समन्वयक म्हणून काम पाहतात प्रा.संदीप तडाखे हे अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम मागील खूप वर्षांपासून सातत्याने राबवित आहेत. त्यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन सातारा जिल्हा समन्वयक पदी निवड केली आहे.
प्रा. संदीप तडाखे यांच्या निवडीबद्दल कोयना शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सोपानराव चव्हाण, उपाध्यक्ष प्रकाश पाटील, जनरल सेक्रेटरी अमरसिंह पाटणकर, तसेच कोयना शिक्षण संस्थेचे संचालक संजीवदादा चव्हाण, याज्ञसेन पाटणकर यांच्यासह सर्व संचालक सदस्य तसेच संस्थेचे इतर सन्माननीय पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.डी. पवार, कार्यालयीन अधीक्षक विजय काटे तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि प्रशासकीय कर्मचारी यांनी अभिनंदन केले.