
दरोड्याच्या तयारीत असलेल्या ३ जणांच्या टोळीस फलटण शहर पोलीस यांनी अटक करण्यात आली असून त्यातील दोघेजण फरार झाले. यावेळी संशयित आरोपीकडून धारदार शस्त्र जप्त करण्यात आली आहेत
फलटण शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांना पोलीस रेकर्डवरील गुन्हेगार अक्षय बाळकृष्ण माने (रा. दिवाणी हाऊस, टोपी चौक, फलटण ) हा त्याच्या साथीदारासह घातक व धारदार हत्यारे लाठ्या, काठ्या घेवून एका सिल्व्हर रंगाचे वेरना गाडीमधून उतरले गावाकडे जाणारे रोडवरील येणारी – जाणारी वाहनांना अडवून त्यांचेवर दरोडा टाकणार आहेत व त्यापुर्वी ते मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास मौजे जाधववाडी येथील साईमंदीराचे समोर एकत्र जमणार असल्याची माहिती मिळाली असता पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांनी पोलीस पथक तयार करून बातमीचे ठिकाणी साई मंदिर व परिसरात सापळा लावला. माहिती मिळालेल्या घटनास्थळी दिनांक ७ रोजी रात्री १ वाजण्याच्या सुमारास गिरवी रोड बाजूने एक सिल्व्हर रंगाची गाडी क्र.MH.14 DF.1153 ही साईबाबा मंदीराचे आवारात येवून थांबली. मिळालेल्या माहितीनुसारच गाडी असल्याचे पोलीसांची खात्री झाली असता पोलीस पथकाने सदर गाडीचे दिशेने जावून त्यांचे गाडीला शासकीय गाडी आडवी लावून हत्यारे जवळ बाळगून व दरोडा टाकण्याची पुर्व तयारी करून दरोड्याच्या तयारीत असलेल्या सबधितांना ताब्यात घेत असताना गाडीतील पाठीमागे बसलेले दोन जण दरवाजा उघडून अंधारात मंदिराच्या पुर्व बाजूस असणारे अपार्टमेंटमधून पळून गेले. अब्दुल शेख, वय 28, रा. गजानन चौक, फलटण अक्षय बाळकृष्ण माने ,वय 26, राम मंदिराशेजारी,फलटण अभिषेक ज्ञानेश्वर महेंद्रे वय 27 रा. लक्ष्मी नगर, फलटणया तीन जणांना पोलिसांनी पोलिसांनी अटक केली आहे .त्यांची झडती घेतली असता एक चाकू, एक तलवार, 8 लाख 12 हजार 550 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.पळून गेलेल्या दोघा जणांचा पोलीस शोध घेत आहे. पाच जणांच्या विरोधात पोलीस फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे



























