नाडोली ग्रामपंचायतीचे सरपंच अरविंद पवार यांना स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. हा पुरस्कार गावातील सरपंच यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेऊन विशेष गौरव म्हणून प्रदान करण्यात येतो. अरविंद पवार यांच्या कार्याची विशेष दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुरस्कार वितरण सोहळा आमदार निलेश लंके पारनेर विधानसभा, भास्कर पेरे पाटील आदर्श सरपंच पाटोदा, पद्मश्री सौ. राहीबाई पोपेरे (बिजमाता) अहमदनगर, मा. यादवराव पासवे संस्थापक सरपंच सेवा संघ यांच्या शुभ हस्ते माऊली संकुल सभागृह अहमदनगर येथे पार पडला.
या कार्यक्रमास मा. एकनाथ ढाकणे राज्य अध्यक्ष ग्रामसेवक युनियन महाराष्ट्र राज्य, या. बाबासाहेब पावसे युवा नेतृत्व सरपंच सेवा संघ, डॉ. राधेशाम गुंजाळ अध्यक्ष महाराष्ट्र होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, ह. भ. प. राजेंद्र गरुड महाराज सणसवाडी शिरूर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच राज्यातील विविध गावांच्या सरपंचांच्या विशेष उपस्थितीत हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
माझ्या राजकीय, सामाजिक क्षेत्रामध्ये मा. नामदार शंभूराजे देसाई साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना मला मा. पद्मश्री पुरस्कार प्राप्त सौ. राहीबाई पोपेरे (बिजमाता) यांच्या हस्ते राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार प्रधान करण्यात आला.
हा पुरस्कार माझ्या एकट्याचा सन्मान नसून माझे गाव, माझ्या प्रत्येक कामाची प्रेरणा व कौतुकाची थाप देणारे, अशा सर्वांच्या आशीर्वादाने हे प्राप्त झाले. मी सदैव गावच्या विकासासाठी कटिबद्ध राहील.
-अरविंद पवार