म्हसवड प्रतिनिधी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १४ एप्रिल रोजी १३१ वी जयंती निमित्त सामाजिक समता सप्ताह ६ ते १६ एप्रिलपर्यंत आयोजित करण्यात आला त्याचे उदघाटन सिध्दनाथ हायस्कूल व ज्युनियर काॅलेज म्हसवडचे प्राचार्य पी यु दासरे, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार एल के सरतापे, शाळेचे मुख्याध्यापक श्री जंगम व्ही एस, गृहपाल श्री पाठक व्ही एस, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा लांब वस्ती म्हसवड, ता-माण, जि-सातारायेथे दि. ७ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमा निमित्त निबंध व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.होते यशस्वी विद्यार्थी यांना सिध्दनाथ हायस्कूल व ज्युनियर काॅलेज चे प्राचार्य प्रविण दासरे सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार एल के सरतापे यांचे हस्ते शालेय साहित्य देवून गौरव करण्यात आला निबंध स्पर्धा क्रमांक १)कु.तेजराज लोखंडे २)कु. गोविंद वसावे ३)कु. महेश तोरणेचित्रकला स्पर्धा क्रमांक१)कु.सुरेश कांबळे २)कु.गोविंद वसावे ३)कु.प्रतीक बनसोडे याप्रसंगी प्रमुख पाहुणे प्राचार्य मा. श्री दासरे सर , समाजसेवक मा. श्री सरतापे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवना विषय माहिती सांगितली यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री जंगम व्ही एस, गृहपाल श्री पाठक व्ही एस, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते





















