महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : कराड बसस्थानका नजीक असलेल्या सिटी ईन बार व देशी दारू दूकाना समोर पोलीसांच्या रेकॉर्डवर असलेल्या तडीपार गुन्हेगार यूवकावर पूर्वीच्या वादाच्या रागातून दोघांनी लाकडी दांडक्याने निर्दयपणे मारहाण केल्याची आज दूपारी घटना घडल्याने परिसरात खळबळ माजली आहे. या मारहाणीत संबधित यूवक गंभीर जखमी झाला असून त्यास काॅटेज हाॅस्पिटल व नंतर सातारा सिव्हिल रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या मारहाण प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. जमीर मलिक शेख (फकीर) वय 30, रा. ओगलेवाडी-हजारमाची असे या हल्यात जखमी झालेल्याचे नाव आहे.
याबाबत घटना स्थळावरुन व पोलिसांनी दिलेल्या माहिती नूसार कराड बसस्थानक परिसरात देशी दारू व सिटीइन बारच्या समोर साडेतीन वाजण्याच्या सूमारास हाजारमाची येथिल जमीर शेख याच्यावर दोघांनी अचानक हल्ला केला. लाकडी दांडक्याने निर्धयपणे तीस ते चाळीस वेळा लाकडी दांडक्यांनी हल्ला चढवला. या हल्ह्यात शेख याच्या डोक्याला जबर मार लागून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्याने त्याला तात्काळ काॅटेज हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला सातारा सिव्हिल येथे हलवण्यात आले.
दरम्यान या हल्याची माहिती मिळताच कराड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तत्पूर्वी, जमीर शेख याला उपचारासाठी कराड येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले होते. त्याठिकाणी त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर त्याला अधिक उपचारासाठी सातारा येथील सिव्हिल रुग्णालयात पाठवण्यात आले. त्याठिकाणी त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
या हल्या प्रकरणी कराड पोलिसांनी कामगार चौकातील संशयित दोघांना ताब्यात घेतले आहे. याबाबत कराड पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. जमीर शेख हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर ओगलेवाडी, कराड पोलीसात विविध कलमान्वये गुन्हे दाखल असून काही गून्ह्यात तो तडीपार असल्याची माहिती समोर आली आहे.
शेख याने कराड शहरात कामगार चौकात अनेकांना धमकावून, मारहाण करुन पैसे वसूल करीत कराडसह ओगलेवाडी, हजारमाची परिसरात दहशत माजवली होती.शिवाय सांगली जिल्ह्यातील कडेगाव परिसरात ही त्याने दहशत माजवली होती.कराड परिसरातील एका प्रकरणात त्याच्याविरूध्द पोलिसात तक्रार करण्यात आल्याने त्याने काल तक्रारदाराच्या घरात जाऊन जाब विचारत धमकी दिली होती. त्यांनंतर आज शेख हा बसस्थानक परिसरातील सिटी ईन बार व देशी दारू दूकानासमोर आल्याची माहिती मिळताच दोघांनी त्याच्यावर हल्ला केला.






























