आदर्शमाता प्रतिष्ठानने केसे गावाबद्दलची आपुलकी जपली- तंटामुक्ती अध्यक्ष जयसिंगराव शिंदे. प्रतिक्षा वास्के हिचा केसे येथे भव्य सत्कार
आदर्शमाता प्रतिष्ठानने केसे गावाबद्दलची आपुलकी जपली- तंटामुक्ती अध्यक्ष जयसिंगराव शिंदे. प्रतिक्षा वास्के हिचा केसे येथे भव्य सत्कार
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : केसे तालुका कराड येथील प्रतिक्षा शरद वास्के हिने औरंगाबाद जिल्ह्यात खेळामध्ये विशेष प्राविण्य मिळविल्याबद्दल आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानने प्रतीक्षा चा सत्कार करून केसे गावाबद्दलची आपुलकी जपली असल्याचे गौरवोद्गार केसे गावचे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष आणि माजी सरपंच जयसिंगराव शिंदे यांनी काढले.
प्रतिक्षा शरद वास्के हिने औरंगाबाद जिल्ह्यात 20 वर्षाखालील 100 मीटर धावणे आणि लांब उडी या क्रीडा प्रकारात जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवले आहे, त्याबद्दल पाडळी (केसे), तालुका कराड येथील आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानच्या वतीने केसे येथे सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी केसे गावचे सरपंच प्रदीप शिंदे, उपसरपंच युनूस सुतार,आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते, कराड पंचायत समितीचे माजी सदस्य प्रकाश वास्के, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ आवळे, केसे ग्रामपंचायतीच्या सदस्या सौ उमा शरद वास्के, संभाजीराव शिंदे, राजेंद्र शिंदे, उत्तम पाटील, अधिक जालिंदर शिंदे, गजानन गुरव,बाबासो शंकर शिंदे, लालासो शिंदे अधिक्राव भास्कर शिंदे, गणेश कुंभार यांची प्रमुख उपस्थिती होती
. यावेळी बोलताना केसे गावचे सरपंच प्रदीप शिंदे म्हणाले, प्रतिक्षा वास्के तिने विविध स्पर्धांमध्ये उज्वल यश संपादन करून गावाच्या लौकिकात भर टाकले असून, याची दखल घेऊन आदर्श माता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानच्यावतीने तिचा केलेला सन्मान म्हणजे सत्कार्याला साथ हीच विचारधारा प्रतिष्ठान जपत असून, अशा प्रदेशांच्या कामाला सदैव व आमचे पाठबळ राहील असे आश्वासन सरपंच प्रदीप शिंदे यांनी दिले.स्वागत राजेंद्र शिंदे (आप्पा) यांनी केले, प्रास्ताविक आदर्श माता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते यांनी केले. तर आभार अधिक जालिंदर शिंदे यांनी मानले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.