
कडून घेतली जाणारी इयत्ता बारावीची परीक्षा आज दिनांक०४ मार्च २०२२ पासून म्हसवड व परिसरात ज्या ठिकाणी शाळा आहे त्या ठिकाणी परिक्षा सुरू होत असून सिध्दनाथ हायस्कूल व ज्युनियर काॅलेज म्हसवड या १४३ केंद्रावरील एकूण ३८८ विद्यार्थी तर म्हसवड मधील दुसरे मेरिमाता इंग्लिश स्कूल या केंद्र क्रमांक १४४ या ठिकाणी २९९ विद्यार्थी असे एकूण ६८७ विद्यार्थी ज्या शाळेचे आहेत त्या शाळेत कोव्हीड १९ च्या अनुशंगाने रोगराई पसरुन विद्यार्थ्यांना धोका होऊ नये यासाठी महाराष्ट्र परिक्षा मंडळाने निर्णय घेतला असल्याने शासनाच्या नियमानुसार म्हसवड परिसरातील १० शाळामध्ये परिक्षा होणार आहे
म्हसवड येथील सिध्दनाथ हायस्कूल व ज्युनियर काॅलेज या केंद्र क्रमांक १४३असून केंद्र संचालक
म्हणून प्राचार्य पी यु दासरे यांची केंद्र संचालक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे तर उप केंद्र संचालक म्हणून डी टी ननावरे, सी वाय चव्हाण, डॉ डी डी नरळे देवापुर हे राहणार आहेत
१४४ मेरिमाता इंग्लिश स्कूल म्हसवड या केंद्रावर केंद्र संचालक प्रा. डी पी गोंजारी तर या ठिकाणी एकूण २९९ विद्यार्थी परिक्षा देत आसुन या केंद्राचे उप केंद्रावर मेरिमाता इंग्लिश स्कूल, मोहि, भालवडी, दिवड, सरस्वती काॅलेज, नागनाथ आण्णा नायकवडी ॅ काॅलेज, व ज्ञानवर्धीनी हायस्कूल व ज्युनियर काॅलेज या ठिकाणच्या शाळा मध्ये उपकेंद्र तयार करुन ज्या शाळेचे विद्यार्थी त्याच शाळेत परिक्षा देणार आहेत तर ज्या उप केंद्रावर परिक्षा होत आहे त्या शाळेचे प्राचार्य व शिक्षकच सह केंद्र संयोजनक राहणार आहेत
या सिध्दनाथ हायस्कूल व ज्युनियर काॅलेज व मेरिमाता इंग्लिश स्कूल या दोन केंद्रावर कोरोणाच्या पार्श्वभूमीवर
ज्या ठिकाणी विद्यार्थी आहेत त्या ठिकाणी उपकेंद्र
असून म्हसवड या केंद्रावर म्हसवड व देवापुर या दोन काॅलेज मधील कला, वाणिज्य, विज्ञान व व्ही. सी. एम. सी सह परिक्षा देणार असल्याचे सांगून. परीक्षा कालावधीत
बोर्डाच्या सर्व सूचनांचे व कोरोनाच्या सर्व नियमांचे
काटेकोर पालन केले जाईल. विद्यार्थ्यांनी भयमुक्त
वातावरणात परीक्षा द्यावी. विद्यार्थ्यांनी परीक्षेस
येताना स्वतः ची पाणी बोटल आणावी. तसेच सर्व
केंद्र कॉपीमुक्त राहण्यासाठी दक्षता समिती स्थापन व काॅफीमुक्त केंद्रासाठी पथक तयार केले असल्याची माहिती केंद्र संचालक व प्राचार्य पी यु दासरे यांनी सांगितले































