महाराष्ट्र न्यूज फलटण प्रतिनिधी गणेश पवार दि.१६
सुरवडी येथून सुसाईङ नोट लिहून युवक दि १३ डिसेंबर पासून बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उङाली असून या युवकाचा पोलीसांसह सर्वजण शोध घेत आहेत. याबाबत फलटण ग्रामिण पोलीस ठाण्यातून मिळालेली माहीती अशी की , सुरवडी (१५ फाटा)ता.फलटण येथून चैतन्य राजेंद्र रोकडे (वय २१) मुळ गांव वाठार निंबाळकर फलटण येथील हा युवक सुसाईङ नोट लिहून बेपत्ता झालेला आहे .मुळ वाठार निंबाळकर येथील चैतन्य हा गेले ७/८ वर्षे आपल्या बहीणीकङे सुरवडी येथे राहत होता. वाठार निंबाळकर येथे त्यांचे आई वङील भाऊ आहे. सुसाईङ नोटमध्ये मी चैतन्य आत्महत्या करीत आहे. मी कॕनाल मध्ये औषध पिऊन जीव देत आहे.मी माझ्या शारीरिक आणि मानसिक ञासाला कंटाळून जीव देत आहे.माझ्या नंतर माझ्या शेरङाची, गाईची , आजी, मामा , दिदीची काळजी घ्या असे नमूद केलेले आहे.याबाबतचा अधिक तपास पोलीस हवालदार तुकाराम सावंत करीत आहे.