कराड : साताऱ्यात गुरुवारी झालेल्या आंदाेलनात बंडातात्या कराडकरांनी नेत्यांवर टीका केली हाेती.
माझं चुकलं, मी माफी मागताे! आमदार बाळासाहेब पाटील यांच्या चिंरजीवबद्दल अनावधाने वक्तव्य केले गेले. माझे वक्तव्य हे निराधार आहे. माझ्याकडून बाेलण्यातून चूक झाली. माझे आणि बाळासाहेब पाटील यांचे निकटचे संबंध आहेत. त्यांच्या विषयी माझ्याकडून झालेले वक्तव्याबद्दल मी माफी मागताे असं ह.भ.प बंडातात्या कराडकर बाेलताना नमूद केले.
बंडातात्या कराडकर हे गुरुवारी सातारा येथे व्यसनमुक्त संघच्या वाईन विक्रीच्या निर्णयाच्या विराेधातील आंदाेलनात सहभागी झाले हाेते. त्यावेळी बंडातात्यांनी काेणता पुढारी मद्य घेत नाही असं म्हणत अनेक मान्यवर नेत्यांची नावे घेत टीका केली हाेती. आज (शुक्रवार) बंडातात्यांनी बराेबर बाेलताना सर्व वक्तव्यांबद्दल माफी मागितली आहे.
बंडातात्या म्हणाले गुरुवारी झालेल्या वाईन विक्रीच्या निर्णया विराेधातील आंदाेलनात मी बाळासाहेब पाटील यांच्यासह अन्य राजकीय नेत्यांची नावे घेत त्यांच्यावर आराेप केले. खरंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर बाेलताना माझ्याकडून चूक झाली. त्यामुळे सर्व नेत्यांची आणि विशेष म्हणजे बाळासाहेब पाटील यांच्या कुटुंबियांची मी माफी मागताे असे बंडातात्यांनी नमूद केले.
बंडातात्या कराडकरांना पाेलीस ताब्यात घेणार; चुकलं असेल तर क्षमा मागेन, तात्यांची ग्वाही
बाळासाहेब यांचे चिरंजीव यांचे वागणं तसं नाही. त्यांचे कार्य उत्तम आहे. अनेक वर्षांपासून माझे त्यांच्याशी निकटचे संबंध आहेत. त्यामुळे बाळासाहेबांविषयी दिलगिरी व्यक्त करताे.