राज्य शासनाच्या द्विवर्षपूर्तीनिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने मंत्रालयाच्या त्रिमुर्ती प्रांगणात चित्रमय प्रदर्शन आयोजित केले आहे. या प्रदर्शनास राज्यमंत्री राजेंद्र पाटील – यड्रावकर यांनी आज भेट देऊन पाहणी केली. या प्रदर्शनाच्या माध्यमातून शासनाचे निर्णय, योजना या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यास मदत होईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक दयानंद कांबळे, उपसंचालक श्रीमती सीमा रनाळकर उपस्थित होते.
राज्यमंत्री श्री. यड्रावकर म्हणाले, ‘दोन वर्ष जनसेवेची, महाविकास आघाडीची’ या संकल्पनेवर आधारीत महासंचालनालयाने उत्कृष्ट मांडणी केली असून या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. या प्रदर्शनात रोजगार हमी योजना, फलोत्पादन, आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्य आदी विभागांच्या निर्णयांच्या फलकांची आणि संबंधित छायाचित्रांची त्यांनी आवर्जून पाहणी केली.
यावेळी राज्यमंत्री श्री.यड्रावकर यांनी प्रदर्शनातील ३६० डिग्री सेल्फी पॉईंट येथे भेट देऊन, शासनाच्या प्रसिद्धीचे फलक घेऊन व्हिडीओ सेल्फीही घेतला.