पाटण/ प्रतिनिधी -कोयना धरणग्रस्त व अभयारण्यग्रस्त आंदोलनाचा गुरूवारी 4था दिवस होता, या दिवशी श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ भारत पाटणकर यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन या आंदोलनमध्ये सातारा, सांगली, रत्नागिरी, पालघर, ठाणे व ज्या ज्या ठिकाणी धरणग्रस्त आहेत त्या त्या ठिकाणी लोकांच्या घरासमोर आंदोलन सुरू आहेत. या आंदोलनाची दिवसेंदिवस तीव्रता वाढत आहे व लोकांच्या पाठिंब्यामुळे हे आंदोलनाचे लोन पूर्ण महाराष्ट्र भर जाईल आणि हे आंदोलन सातारा जिल्ह्यातील प्रशासनासह सरकारला जड जाणार अशी प्रतिक्रिया कोयना प्रकल्पग्रस्तांनी व्यक्त केली . गुरुवारी आंदोलनाच्या 4 था दिवशी सांगोला तालुक्यातील लोकांनी पुणे येथील रहिवासी असल्यानी आज आंदोलन करून कोयना धरणग्रस्त ना पाठिंबा दिला व या बाबत शासनाने आंदोलन कर्त्यांची दखल नाही घेतल्यास आंदोलनाचा वानवा पेटू शकतो यामुळे महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर दखल घेऊन झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी होत नाही तो पर्यंत आंदोलन सुरूच राहून त्याची तीव्रता वाढत जाणार अशी आशा धरणग्रस्त व अभयारण्य ग्रस्त लोकांनी केली आहे याबाबत महाराष्ट्रातील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व सातारा पालकमंत्री ह्यांनी पुढाकार घेऊन लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावावे