विजयकुमार जगताप यांच्या नेतृत्वाखाली निवड संपन्न
महाराष्ट्र न्यूज /वरकुटे-मलवडी प्रतिनिधी : महाबळेश्वरवाडी ता. माण येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी मारुती खंडू मदने यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सुनंदा मुरलीधर जगताप यांनी उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी सरपंच अंकुश गाढवे यांच्या अध्यक्षतेखाली व माजी सरपंच विजयकुमार जगताप यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीच्या इमारतीत निवड प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक उमेश कोळी व ग्रामविस्तार अधिकारी आय.ए.शेख यांनी काम पाहिले. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण केली.
एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला उपसरपंच पदाची संधी मिळाल्याने माण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रभाकर देशमुख, सातारा जिल्हा बँकेचे संचालक अनिल देसाई, वरकुटे-मलवडीचे सरपंच बाळकृष्ण जगताप, राष्ट्रवादी युवकचे राज्य सरचिटणीस अभय जगताप, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब माने, माजी सरपंच रामचंद्र नरळे, विक्रम शिंगाडे, धिरज जगताप, बाळासाहेब आटपाडकर, जालिंदर वाघमोडे,संजय पुकळे, डॉ.आनंदराव खरात, जालिंदर खरात, संजय जगताप, सुनील थोरात, भागवत अनुसे शिवाजी शिंगाडे, रघुनाथ जगताप या मान्यवरांनी अभिनंदन केले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुरेखा चंद्रकांत वगरे, विजय जोतिराम गाढवे, सुवर्णा दत्तात्रय घाडगे, सुनंदा मधुकर जेडगे, तसेच बाळासो कोठावळे, दिगांबर जगताप, बाबा होनमाने, सुरेश घाडगे, आप्पा सुर्यवंशी, नाथा गाढवे, मधुकर जेडगे, विजय पुकळे, उत्तम जगताप, दिपक जगताप, गोरख वगरे, ज्ञानदेव कोठावळे, रमेश जगताप, राहुल कोठावळे, शशीकांत कोठावळे धर्मराज कोठावळे, संतोष, ग्रामस्थ उपस्थित होते.