वाई : वाई भूषण पोपटलाल ओसवाल व त्यांच्या पत्नी कांचन भाभी ओसवाल यांचे गतवर्षी कोरोना काळात निधन झाले होते. यांच्या स्मृतिदिनानिमित्त स्वर्गीय दिनेश ओसवाल स्मृती प्रतिष्ठान यांच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवार दि.२४ सप्टेंबर रोजी वाई बाजार समिती येथे सकाळी दहा वाजता मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. येथे सवलतीच्या दरात चष्मे वाटप करण्यात येणार असून गरजूंना सोयीनुसार मोतीबिंदु शस्त्रक्रियेसाठी पुण्याला पाठवण्यात येणार आहे. तसेच शालेय विद्यार्थ्यांना स्वर्गीय दिनेश ओसवाल प्रतिष्ठानच्या माध्यमातून शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच गतिमंद मुलांसाठी कार्य करणाऱ्या पाचवड येथील आपुलकी शाळेच्या निवासी खोल्यांचे फरशी चे संपूर्ण काम प्रतिष्ठान च्या वतीने करणार असल्याचे व नेत्रचिकित्सा शिबिराचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन नगरसेवक दीपक ओसवाल यांनी केले आहे.






















