लोणंद पोलीस स्टेशन हद्दीतील तांबवे ता.फलटण येथील गावाच्या यात्रेनिमित्त ठेवलेल्या ऑर्केस्ट्रात नाचण्यावरून दोन गटात झालेल्या तुंबळ हाणामारी प्रकरणी दोन्ही गटांकडून परस्पर विरोधी तक्रारी लोणंद पोलीसात दाखल करण्यात आल्या असून दोन्हीकडील सुमारे १९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी सागर राजेंद्र शिंदे याने दाखल केलेल्या फिर्यादीनुसार गावाच्या यात्रेनिमित्त दि. ३ मे रोजी ग्रामपंचायत समोर रात्रीच्यावेळी सुरू असलेल्या ऑर्केस्ट्रा दरम्यान नाचण्यावरून झालेल्या गोंधळात ऋषिकेश अनिल जगताप याने गावाला शिवीगाळ केली म्हणून जाब विचारला असता सुरवातीला शाब्दिक चकमकीनंतर सागर रामचंद्र पवार,आबासो मोहन शिंदे क. मो.वशिंदे,महेंद्र आबासो शिंदे,गजानन संपत शिंदे, सुभाष भुजंग शिंदे, रोहित सुभाष शिंदे, अमित सुभाष शिंदे, अनिकेत नंदकुमार शिंदे, ओंकार ज्ञानेश्वर शिंदे,पंकज अशोक मांढरे, अभिजीत नंदकुमार शिंदे रा.तांबवे ता.फलटण या सर्वांनी मिळून माझ्यासह विशाल रमेश शिंदे,रोहित प्रदिप शिंदे,प्रदिप लक्ष्मण शिंदे, अक्षय दशरथ शिंदे, धनंजय बाळासो शिंदे, राहुल नवनाथ शिंदे, तुषार अरुण शिंदे, गणेश त्रिंबक शिंदे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची फिर्याद दाखल केली आहे तर याच प्रकरणी आबासाहेब मोहन शिंदे यांनी दाखल केलेल्या परस्पर विरोधी तक्रारीनुसार सागर राजेंद्र शिंदे व ऋषिकेश अनिल जगताप हे ऑर्केस्ट्रा चालू असताना नाचत असताना त्यांच्यात वाद झाला म्हणून फिर्यादी स्वतः व सागर ज्ञानेश्वर पवार हे भांडण सोडवण्यासाठी गेले असता तिथे असणारे विशाल रमेश शिंदे याने फिर्यादीतस बाचाबाची करुन खाली जमीनिवर पाडले त्याच वेळी रोहीत प्रदीप शिंदे याने फिर्यादीस हातात दगड घेवुन माझे कपाळावर मारहाण केली प्रदीप लक्ष्मण शिंदे याने लाकडी दांडक्याने उजव्या हातावर व डाव्या पायावर मारहाण केली तसेच सागर राजेंद्र शिंदे यानेही खाली पाडून लाथाबुक्याने मारहाण केली तर राहुल नवनाथ शिंदे याने हाताने पाठीवर मारहाण केली अक्षय दशरथ शिंदे व वैभव राजेंद्र शिंदे या दोघांनीही लाथाबुक्यानी मारहाण केली तर धनंजय बाळासो शिंदे याने चप्पलने मारहाण केल्याची तक्रार लोणंद पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
या प्रकरणात दोन्ही बाजूकडील एकोणीस जणांवर लोणंद पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून सपोनि विशाल वायकर यांच्या मार्गदर्शनानुसार पोहवा बी. के. पवार आणि बनकर करीत आहेत.
लोणंद पोलीस स्टेशन हद्दीतील तांबवे ता.फलटण येथील गावाच्या यात्रेनिमित्त ठेवलेल्या ऑर्केस्ट्रात नाचण्यावरून दोन गटात झालेल्या तुंबळ हाणामारी प्रकरणी दोन्ही गटांकडून परस्पर विरोधी तक्रारी लोणंद पोलीसात दाखल करण्यात आल्या असून दोन्हीकडील सुमारे १९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी सागर राजेंद्र शिंदे याने दाखल केलेल्या फिर्यादीनुसार गावाच्या यात्रेनिमित्त दि. ३ मे रोजी ग्रामपंचायत समोर रात्रीच्यावेळी सुरू असलेल्या ऑर्केस्ट्रा दरम्यान नाचण्यावरून झालेल्या गोंधळात ऋषिकेश अनिल जगताप याने गावाला शिवीगाळ केली म्हणून जाब विचारला असता सुरवातीला शाब्दिक चकमकीनंतर सागर रामचंद्र पवार,आबासो मोहन शिंदे क. मो.वशिंदे,महेंद्र आबासो शिंदे,गजानन संपत शिंदे, सुभाष भुजंग शिंदे, रोहित सुभाष शिंदे, अमित सुभाष शिंदे, अनिकेत नंदकुमार शिंदे, ओंकार ज्ञानेश्वर शिंदे,पंकज अशोक मांढरे, अभिजीत नंदकुमार शिंदे रा.तांबवे ता.फलटण या सर्वांनी मिळून माझ्यासह विशाल रमेश शिंदे,रोहित प्रदिप शिंदे,प्रदिप लक्ष्मण शिंदे, अक्षय दशरथ शिंदे, धनंजय बाळासो शिंदे, राहुल नवनाथ शिंदे, तुषार अरुण शिंदे,

गणेश त्रिंबक शिंदे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची फिर्याद दाखल केली आहे तर याच प्रकरणी आबासाहेब मोहन शिंदे यांनी दाखल केलेल्या परस्पर विरोधी तक्रारीनुसार सागर राजेंद्र शिंदे व ऋषिकेश अनिल जगताप हे ऑर्केस्ट्रा चालू असताना नाचत असताना त्यांच्यात वाद झाला म्हणून फिर्यादी स्वतः व सागर ज्ञानेश्वर पवार हे भांडण सोडवण्यासाठी गेले असता तिथे असणारे विशाल रमेश शिंदे याने फिर्यादीतस बाचाबाची करुन खाली जमीनिवर पाडले त्याच वेळी रोहीत प्रदीप शिंदे याने फिर्यादीस हातात दगड घेवुन माझे कपाळावर मारहाण केली प्रदीप लक्ष्मण शिंदे याने लाकडी दांडक्याने उजव्या हातावर व डाव्या पायावर मारहाण केली तसेच सागर राजेंद्र शिंदे यानेही खाली पाडून लाथाबुक्याने मारहाण केली तर राहुल नवनाथ शिंदे याने हाताने पाठीवर मारहाण केली अक्षय दशरथ शिंदे व वैभव राजेंद्र शिंदे या दोघांनीही लाथाबुक्यानी मारहाण केली तर धनंजय बाळासो शिंदे याने चप्पलने मारहाण केल्याची तक्रार लोणंद पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
या प्रकरणात दोन्ही बाजूकडील एकोणीस जणांवर लोणंद पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून सपोनि विशाल वायकर यांच्या मार्गदर्शनानुसार पोहवा बी. के. पवार आणि बनकर करीत आहेत.






















